Share

भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात पण…, एकनाथ खडसेंच्या दाव्याने चर्चांना उधाण

eknath khadse

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्ष विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आमदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे. (Eknath Khadse Statement on BJP mla)

या भेटीत विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे आणि बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची आज विरारमधील विवा महाविद्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे म्हणाले की, “मी उमेदवार आहे. बहुजन विकास आघाडीची तीन मते आहेत. त्यामुळे मते मागायला मी या ठिकाणी आलो आहे. हितेंद्र ठाकूर योग्य निर्णय घेतील, अशी मला आशा आहे. मी या ठिकाणी शब्द घेण्यासाठी आलो नाही तर मतं मागण्यासाठी आलो आहे. उमेदवार म्हणून मतं मागणे आपलं काम आहे”, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, “हितेंद्र ठाकूर आणि आमचा ३२ वर्षांपासूनचा संबंध आहे. राजकारणाव्यतिरिक्त आमची ओळख आहे. या भेटीदरम्यान आमच्यात कौटुंबिक चर्चा देखील झाली”, असे एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपमधील अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगितल आहे.

“भाजपमध्ये आपले अनेक समर्थक आहेत. त्यामधील काही जण माझ्या संपर्कात आहेत. पण पक्ष सोडून ते मला मतदान करतील, असं वाटत नाही. भाजप आमचा प्रमुख विरोधक आहे. भाजपाला विधान परिषदेच्या निवडणुकीत धूळ चारण्यासाठी आम्ही सज्ज आहोत”, असे राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.

मतदानापूर्वी राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी भाजप आमदारांना फोन केल्याचे सांगितले जात आहे. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी भाजप आमदारांकडे स्वतःसाठी मते मागितली आहेत. यावेळी तुम्हाला मला मतदान करावंच लागेल, असे एकनाथ खडसे यांनी भाजप आमदारांना सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदारांकडे मदत मागितल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
VIDEO: काका! माझं करिअर उद्ध्वस्त होईल, अग्निपथला बंद करा, रडत रडत आंदोलकाची अधिकाऱ्याला मिठी
आनंद महिंद्रांची मोठी घोषणा, चार वर्षांनी निवृत्त झाल्यानंतर अग्नवीरांना देणार नोकरी, म्हणाले..
प्रकृती नाजूक असतानाही मुक्ता टिळक मुंबईला रवाना; म्हणाल्या, ‘पक्षाचा आदेश रक्तात भिनलेला…’

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now