एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजप पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला होता. एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. पण नेमकं एकनाथ खडसे आमदार झाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. यावरून सोशल मीडियावर अनेक विनोद देखील व्हायरल होत आहेत.(eknath khadse statement on bjp girish mahajan)
याचा संदर्भ घेत भाजप नेते गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे यांच्यावर खोचक टीका केली होती. “मंदिरात गेले तर प्रसाद संपला अन् बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली”, अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. आता राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना खोचक टोला देखील लगावला आहे. “गिरीश महाजन यांनी आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली आहे. माझे पादत्राणे घेऊनच ते मत मागायचे”, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. एकनाथ खडसे यांनी काल प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, “गिरीश महाजन बालिश आहेत. ते प्रगल्भ विचारांचे नाहीत. त्यांनी आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली आहे. त्यामुळे आज त्यांना माझ्या पादत्राणांची आठवण झाली आहे. माझे पादत्राणे घेऊनच ते मत मागायचे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे माझ्या पादत्राणाकडे अधिक लक्ष असतं. पण त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही”, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीत प्रवेश करताच सरकार कोसळलं आणि नवीन सरकार स्थापन झालं. यावरून सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. या मीम्सचा संदर्भ देत भाजप नेते गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला होता.
“एकनाथ खडसे यांना आमदारकीवरचं समाधान मानावे लागणार आहे. मंदिरात गेले तर प्रसाद संपला अन् बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी एकनाथ खडसे यांची स्थिती झाली आहे”, असे भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले होते. यामुळे सध्या गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याची चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘या’ प्रसिद्ध खेळाडूच्या सुनेला करावं लागतंय पॉर्न इंडस्ट्रीत काम, घरावर आलंय आर्थिक संकट
दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्यासोबत काम करावं लागत होतं म्हणून बंडखोरी केली- एकनाथ शिंदे
…म्हणून राष्ट्रपतिपदाची उमेदवारी नाकारली; शरद पवारांनी केला मोठा खुलासा