चंद्रकांत पाटील यांनी आता ठरवावे, हिमालयात जायची की कोठे !

मुंबई | पुण्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजपने हातातली आणखी एक जागा गमावली आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचे बोलले जात आहे.

अशातच पुण्याची जागा पराभूत झाली तर आपण हिमालयात निघून जावू असे जाहिरपणे सांगणारे चंद्रकांत पाटील आता हिमालयात कधी जाणार ? याचीच आपण वाट पाहत आहोत, असा टोला माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, ‘विधानपरिषदेच्या सहा जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. पाच जागावर भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. धुळे-नंदुरबार मतदार संघात भाजपचा उमेदवार विजयी झाला.’

दरम्यान, पुढे बोलताना खडसे म्हणाले, ‘भाजपच्याच नेत्यांनी मान्य केले आहे  कि महाविकास आघाडीचे मते फुटल्याने आम्हाला यश मिळाले आहे. त्यामुळे सहावी जागाही त्यांची गमावल्यासारखीच आहे. भारतीय जनता पक्षाची या निवडणूकीत पिछेहाट झाली असल्याचे खडसे यांनी म्हंटले.

..तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा

शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य पुरुषोत्तम बरडे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे यंदा पुण्याची लढत प्रतिष्ठेची झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या
भारताकडून १६० कोटी कोरोना लसींच्या डोसची नोंदणी; सर्वाधिक नोंदणी करण्यात भारत आघाडीवर
‘एकटेच लढणार अन् जिंकणार ही चंद्रकांत पाटलांची खुमखुमी चांगलीच जिरली’
‘महाविकास आघाडीची ताकद ओळखण्यास कमी पडलो’, देवेंद्र फडणवीस झाले चीतपट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.