Share

Eknath Khadse : खडसेंनी उघड केले प्रफुल्ल लोढा – गिरीश महाजन प्रकरणातील धक्कादायक कनेक्शन; SIT चौकशीची मागणी

Eknath Khadse :  मुंबईच्या राजकारणात सध्या एक गुंतागुंतीचं आणि थरकाप उडवणारं प्रकरण पुन्हा ऐरणीवर आलं आहे. शेतकरी, सामान्य नागरिकांच्या मनात हळहळ निर्माण करणाऱ्या हनीट्रॅपसारख्या घटनांनी पुन्हा एकदा प्रशासनाचं डोळं उघडावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar NCP) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे करत एकेक नावे समोर आणली. नाशिकमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर, जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातल्या जामनेर (Jamner) येथील भाजप कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा (Prafull Lodha) याच्यावर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर आरोप असल्याचे खडसे यांनी सांगितले.

खडसे म्हणाले, लोढ्याने याआधी वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयातील रामेश्वर नाईक (Rameshwar Naik) आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतरच लोढ्याविरोधात दोन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, छळ, ब्लॅकमेलिंग, फोटो काढून धमकावणे यांसारख्या आरोपांवर गुन्हा नोंदवला गेला आहे.

खडसे यांनी असा आरोप केला की, हाच प्रफुल्ल लोढा (Prafull Lodha) पूर्वी काँग्रेसमध्ये (Congress) होता, त्यानंतर राष्ट्रवादीत (NCP), आणि शेवटी भाजपमध्ये (BJP) गेला. त्याचा पक्षप्रवेश खुद्द देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत झाला होता. विशेष म्हणजे त्यावेळी रामेश्वर नाईक देखील उपस्थित होते.

तक्रार नोंदवल्यानंतर लोढ्याला धमक्या मिळाल्याचा आरोपदेखील खडसे यांनी केला. लोढ्याने तयार केलेल्या एका व्हिडिओचा दाखला देत, “एक बटण दाबलं की देशात हाहाकार माजेल” असं त्यात म्हटलं असल्याचं सांगितलं. या व्हिडिओमध्ये लोढ्याने ट्रायडंट हॉटेल (Trident Hotel) संदर्भातील काही माहिती असल्याचेही नमूद केल्याचं खडसे सांगतात.

एकनाथ खडसे यांची मागणी आहे की या प्रकरणाची स्थानिक पातळीवर पारदर्शक चौकशी शक्य नाही. त्यामुळे उच्चस्तरीय एसआयटी (SIT) चौकशी तातडीने करावी. हे प्रकरण केवळ एक व्यावसायिक हनीट्रॅपचं नसून, यामध्ये राजकीय हस्तक्षेप, धमक्या आणि सत्तेचा दुरुपयोग झाल्याचा गंभीर संशय आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now