राजीनाम्याच्या वृत्तावर खुद्द एकनाथ खडसेंनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले… 

मुंबई | भाजपमध्ये नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु, अजूनही खडसे यांच्या प्रवेशाची तारीख निश्चित झालेली नाहीये. माञ गुरूवारचा मुहूर्त निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच खडसे यांनी भाजपचा राजीनामा देखील दिल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. परंतु याबाबत खडसे यांनी दिलेल्या एका वृत्तवाहिनीच्या मुलाखती दरम्यान भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी राजीनाम्याच्या वृत्तावर भाष्य केले आहे.

ते म्हणाले, ‘मी पक्ष सोडला नाही, राजीनामा दिला नसल्याचं खडसे यांनी स्पष्ट केले आहे. खडसे यांच्या या स्पष्टीकरणामुळे तुर्तास खडसे यांनी भाजपला राम राम ठोकल्याच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर तीन दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांनीही भाष्य केले होते. ‘खडसे राष्ट्रवादीत येणारच नाहीत,’ असे त्यांनी म्हंटले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या
३१ ते ४० वयोगटातील लोकांना कोरोनाचा धोका अधिक; जाणून घ्या यामागचे कारण
एखाद्या चित्रपटाच्या फिल्मी स्टोरीप्रमाणे ‘या’ अभिनेत्याचे कुटुंब एका रात्रीत संपल
म्हणून शक्तीमान मुकेश खन्नांनी अजूनही नाही केले लग्न! सांगीतले धक्कादायक कारण
फेमस काॅमेडीयन राजू श्रीवास्तवला काम मिळणेही बंद झाले यामागे आहे हे धक्कादायक कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.