मुंबई| बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू असताना माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सोमवरी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी सदर प्रकरणात पाठपुरावा करणाऱ्या ॲड. किर्ती पाटील देखील उपस्थित होत्या.
‘बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी २०१८ पासून पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाकडून याची चौकशी करण्याचे आदेश असताना देखील त्यावेळी प्रकरण दडपण्यात आले. मात्र आता यातील सर्व सत्य बाहेर येणार असून, या प्रकरणात बड्या नेत्याचे नाव असून ज्याचा संबंध मंत्र्यांशी राहिला असल्याचा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, ‘बीएचआर’ पतसंस्थेतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरू असून, यात शेकडो जण गुंतले आहेत. राज्यात फडणवीस सरकार असताना त्यांनी हे प्रकरण दडपले होते.
तसेच २०१८ मध्ये याबाबत ठेवीदारांनी माझ्यासह खासदार रक्षा खडसे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. ॲड. कीर्ती पाटील यांनी या फसवणुकीबाबत सविस्तर माहितीही दिली होती. मात्र, त्या वेळी त्यांनी या प्रकरणाबाबत काहीही कारवाई केली नाही, असे खडसे म्हणाले.
मात्र, महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू केल्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळेल. त्यामुळे या सरकारचे आपण अभिनंदन करत आहोत, असे मत खडसे यांनी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
…तर देशातील प्रत्येकाला नाही द्यावी लागणार कोरोनावरील लस – आयसीएमआर
आंदोलकांबद्दल केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; ‘…तर शेतकऱ्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं’
‘…अन् पोलिसांनी थेट राजू शेट्टींच्या कॉलरला घातला हात’, आंदोलनात कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने