कर्जमाफीच्या फक्त घोषणा, अद्याप पूर्ण कर्जमाफी नाहीच’

मुंबई | ‘गेल्या ७५ वर्षांपासून शेतकऱ्यांची परिस्थिती फारशी बदललेली नाही. शासनाने फक्त कर्जमाफीच्या घोषणा केल्या. माञ प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांचं पुर्ण कर्जमाफ झालेले नाही, असे भाजप नेते एकनाथ खडसे म्हणाले आहे.

याबाब ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामेमि केले आहेत माञ प्रत्यक्षात शेतकऱ्याला एकही रूपया मिळाला नसल्याचे एकनाथ खडसे यांनी नमुद केले.

दरम्यान, परतीच्या पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर आर्थिक फटका देखील बसला आहे. हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाले आहे.

तर दुसरीकडे खडसे हे आता लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच केवळ अधिकृत घोषणा बाकी असून पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष खडसेंवर मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
तुमचे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! भाजपच्या शेलारांनी केले चक्क ठाकरेंचे कौतूक
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
‘त्या’ घटनेनंतर पानाला चूना लावनारा भाऊ कदम अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.