राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खुद्द एकनाथ खडसेंनी सोडले मौन, म्हणाले…

मुंबई | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातला आहे. विषेश बाब म्हणजे, घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात आहे.

मात्र आता खुद्द खडसे यांनी यावर भाष्य केले आहे. शुक्रवारी दुपारी खडसे हे खासगी कामानिमित्त जळगावात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले,’या विषयाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त तुम्हीच ठरवले आहेत’.

तसेच खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘खडसे हे अतिशय समजुतदार राजकारणी आहेत. आमच्यासाठी ते नेते असल्याने पक्षाची हानी होईल, अशी कोणतीही कृती ते करणार नाहीत. प्रसारमाध्यमातूनच या चर्चा सुरू आहेत. पण खडसे पक्ष सोडणार नाहीत. त्यांची नाराजगी दूर होईल,’ असे पाटील म्हणाले.

दरम्यान, यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्हा सर्वांची इच्छा आहे की, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. नाथाभाऊंना राजकारण देखील नीट समजते.

याचबरोबर मला विश्वास आहे की, ते योग्य निर्णय घेतील. माझी नाथाभाऊंशी आज कुठलीही चर्चा झालेली नाही. पण, योग्यवेळी चर्चा मी करेन, असे देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या
…म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही- सुप्रीम कोर्ट
हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मदरसे बंद करून दाखवावेत
पानटपरी चालवनारे भाऊ कदम अख्ख्या महाराष्ट्राचे हास्यसम्राट झाले; पहा कसा झाला हा चमत्कार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.