एकनाथ खडसे इन ॲक्शन! मोठा गैरव्यवहार उघड करणार; तेही पुराव्यासहीत

मुंबई | भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्थेत गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधीत काही महत्त्वाची कागदपत्र, पत्रव्यवहार आपल्याकडे असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

याच प्रकरणी खडसे हे आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. ‘या प्रकरणामध्ये बँकेची मालमत्ता ही कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आली आहे, यामध्ये जिल्ह्यातील दिग्गज नेते, आमदार, खासदार आणि माजी मंत्र्याचा सुद्धा समावेश आहे’, असा दावा खडसे यांनी रविवारी केला होता.

तसेच या प्रकरणात जिल्ह्यातील दिग्गजच अधिक असून संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, माजी मंत्री याची पण माहिती असून ती देणार असल्याचेही खडसे म्हणाले आहेत. दरम्यान खडसे यांनी याविषयी तक्रारी करून ते आता कोणावर फास आवळत आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

याचबरोबर बीएआर संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी २०१८ पासून अनेक वेळा तक्रारी केल्या आहे. तसेच खासदार रक्षा खडसे यांच्या लेटरहेडवर देखील दिल्ली इथे अॅड. कीर्ती पाटील यांनी देखील तक्रार केली आहे, असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

या पूर्वीच्या राज्य सरकारने कारवाई थांबवली…
दरम्यान याबाबत पुढे बोलताना ते म्हणतात, राज्य सरकारकडे तक्रार केल्यानंतर सुद्धा सरकारने या प्रकरणाची कारवाईही थांबवली होती. पण, बीएआर संस्था ही मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा २०२ प्रमाणे संस्थेवर कारवाई करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे, त्यामुळे राज्याचे सहकार आयुक्त कारवाई करू शकत नव्हते, त्यामुळे राज्याने आपला अहवाल पाठवून कारवाई थांबवली होती, असे खडसे यांचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या
ऑक्सफर्डची कोरोना लस किती प्रभावी? अखेर WHO ने सोडले मौन; म्हणाले..
भाजपचे माजी मंत्री लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकावले; ऑडिओ क्लिप व्हायरल
”अब्दूल सत्तार तुझ्यासारखे लोकं आमची गाडी धुवायला असतात, औकातीत रहा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.