मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात भाजपवर नाराज असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपला राम राम ठाकणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. माञ अजूनही खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख निश्चित झालेली नाहीये.
परंतु, आता लवकरच खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे समजत आहे. याचबरोबर या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी खडसेंच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचनाही दिल्या असल्याची माहिती मिळत आहे.
तर दुसरीकडे खडसे यांच्या संभाव्य प्रवेशाबाबत शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ‘खडसेंचे कर्तुत्व, काम आणि खानदेशातील त्यांच्या स्थानाकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे पवारांनी म्हंटले आहे. पवारांच्या या वक्तव्याचा अर्थ सध्या लावला जात आहे.
दरम्यान, एकनाथ खडसेंचे भाजप पक्षाच्या उभारणीत मोठे योगदान आहे. पण दुर्देवाने त्यांची नोंद घेतली नाही असं त्यांना वाटतं, त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते असं पवारांनी सांगितल्यामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले होते.
भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहेत. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. दरम्यान सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते व शिवसेना नेते महेश कोठे आणि एमआयएमचे नगसेवक तोफिक शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
मुख्यमंञी उध्दव ठाकरेंचा व्हिडीओ दाखवत फडणवीसांनी करून दिली ‘त्या’ मागणीची आठवण
१००० एकरात २० हजार मॅट्रिक टन बटाटा; वार्षिक उत्पन्न २५ करोड
मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? अखेर शरद पवारांनीच सांगितले कारण