पराभवाच्या भितीने भाजपने पळ काढला, एकनाथ खडसेंचा भाजपवर हल्लाबोल

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणूकीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणूकीत दिग्गज उमेदवार असतानाही पराभवाच्या भीतीने भाजपने पळ काढला, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

एकवीसपैकी एकवीस जागा आमच्या येणार असून महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होणार आहे, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी दाखवला आहे. मतदान झाल्यानंतर मुक्ताई नगरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती सहकारी बँकेची आज निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पॅनेल उभे करण्यात आले आहे. या पॅनेलमधील ११ जागा या आधीच बिनविरोध झाल्या आहे.

तसेच उर्वरित १० जागांसाठी आज मतदान होत आहे. या दहा ही आम्हालाच मिळतील असा दावा एकनाथ खडसे यांनी केलीआहे. मुक्ताईनगरमध्ये मतदान केल्यानंतर त्यांनी असे म्हटले आहे.यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली आहे.

या निवडणूकीत भाजपकडे दिग्गज उमेदवार होते. मात्र त्यांना आपला पराभव डोळ्यासमोर दिसत होता. त्यामुळे त्यांनी या निवडणूकीवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेऊन पळ काढला आहे. उर्वरित दहा जागाही आम्हालाच मिळणार आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नऊ मतदार संघातील १७ जागांसाठी निवडणूका पार पडत आहे. तर आज १७ पैकी १० जागांसाठी मतदान होत आहे. अशात १७ पैकी ७ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-
“एअर इंडिया विकणाऱ्या आणि रेल्वे विकायला निघालेल्यांनी एसटीवर बोलू नये”
तुमच्याकडे ‘हे’ 2 रुपयांचे नाणे असेल तर घरी बसून मिळतील 5 लाख; जाणून घ्या काय करावे
कृषी कायदे लागू केले तरी प्राॅब्लेम, मागे घेतले तरी त्रास; प्रियांका गांधींवर भडकली काॅंग्रेस नेता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.