शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनाने निधन

मुंबई । राज्यातील काँग्रेसचे बडे नेते माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या जाण्याने राज्यात काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण होणार आहे.

एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन त्यांनी अनेकदा निवडणूका जिंकल्या होत्या.

राज्य सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते. एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार केले जाणार आहेत. ते काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते.

तसेच त्यांनी राज्यात मंत्रिपद भूषविले होते. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते.

त्यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. तेव्हा ते जायंट किलर ठरले होते. त्यानंतर दोनवेळा ते दक्षिण मध्य मुंबईतून विजयी झाले होते. पुढे राहूल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता.

गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. त्यांचे सर्वांबरोबर संबंध होते. सामाजिक कामात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती त्यांच्याकडे होती.

ताज्या बातम्या

भारतीयांनो आपण एकत्र येण्याची हीच ती वेळ; पाकीस्तानचा कर्णधार बाबर आझमचे मोठे वक्तव्य

‘मी अजिबात ठिक नाही’, व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टी ढसाढसा रडली

भारत माझ दुसरं घर, तिथल्या लोकांना तडपताना नाही पाहू शकत; ब्रेट लीने केली ४१ लाखांची मदत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.