Share

एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंसोबतचा ‘तो’ वाद पक्षाला भोवला, दोन दिवसांपूर्वीच पडली वादाची ठिणगी

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde)यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीबद्दल आता एक मोठी माहिती समोर आली आहे.(Ekanth Shinde fight with aadity thakre and sanjay raut)

या बंडखोरीच्या दोन दिवस आधीच एकनाथ शिंदे यांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या आमदारांना पवईमधील रिनायसन्स हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेची अतिरिक्त मते काँग्रेसला देण्यासंदर्भात एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये चर्चा झाली होती. या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत मतभेद झाले. एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेची अतिरिक्त मते काँग्रेसला देण्याला विरोध होता.

यावेळी एकनाथ शिंदे यांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी शाब्दिक वाद झाला. यावेळी जोरदार बाचाबाची देखील झाली असल्याचे सांगितले जात आहे. या वादामुळेच एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील नाराजीमुळे देखील एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्या मतदारसंघाला योग्य निधी दिला जात नसल्याची तक्रार शिवसेनेच्या काही आमदारांनी केली होती. शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती देखील केली होती.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून त्रास दिला जातोय,आमच्या कामांची अडवणूक केली जातेय, अशी तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतली जात नव्हती. त्यामुळे शिवसेनेचे आमदार त्रस्त होते. शिवसेनेच्या आमदारांनी यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती.

महत्वाच्या बातम्या :-
स्वाभिमान गहाण ठेवला नाही नसून मुठभर मावळ्यांसोबत राखेतून अस्तित्व घेऊन पुन्हा उभे करणार;अरविंद सावंत यांनी केला विश्वास व्यक्त 
‘शिवसेनेने भाजपसोबत जायला हवे’, बंड न केलेल्या आमदाराचाही उद्धव ठाकरेंना सल्ला
शिंदेंचे ठाकरेंना थेट आव्हान! विधानसभा अध्यक्षांना पाठवलं ७ पानांचं पत्र, ३४ आमदारांच्या सह्या

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now