८ वर्षांचा चिमुरडा अंध आई वडिलांसाठी बनला श्रावणबाळ! ऑटोरिक्षा चालवून करतोय कुटुंबाचा सांभाळ..

समाजात आपण अनेक खडतर परिस्थितींना सामोरे जातो अनेकवेळा अशा काही परिस्थितींमुळे कुटुंबांच्या जबाबदाऱ्या आपल्यावर येतात पण याच जबाबदाऱ्या जर बालवयातच आपल्या अंगावर आल्या तर?

आंध्रप्रदेशच्या चित्तूर या गावातील ८ वर्षीय गोपाळ रेड्डी याने देखील लहान वयातच घराच्या जबाबदाऱ्या आपल्या अंगावर घेतल्या आहेत. आपल्या पालकांना तो रिक्षा चालवून तो कुटुंबाला मदत करतो. गोपाळला दोन लहान भावंडे आहेत.

त्याचे आई वडील हे दोघेही दृष्टिहीन (अंध) आहेत. म्हणूनच तो घरातील अन्नाची गरज भागवण्यासाठी आपल्या कुटुंबाला हातभार लावतो. कुटुंबाला मदत करण्यासाठी तो इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा चालवतो. या मुलाचे आई वडील चित्तूरच्या चंद्रगिरी शहरात भाजी आणि किराणा मालाची विक्री करतात.

कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी तेवढे पुरेसे नसल्याने गोपाळने आपल्या लहान भावंडाची आणि कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे. भावंडांमध्ये सर्वात मोठा भाऊ असल्याने गोपाळने त्याच्या अंध आई वडिलांना हातभार लावण्यासाठी हा निर्णय घेतला. गोपाळ हा इयत्ता तिसरीत शिकतो आणि मोकळ्या वेळेत वाहन चालवतो.

हा चिमुरडा इतक्या लहान वयातच आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीचा भार आपल्या छोट्याश्या खांद्यावर पेलतो आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या वयातील मूल-मुली शाळेत जातात. या वयात खेळतात, मौजमस्ती करतात पण गोपाळ लहान वयातच संसार रूपी जीवनाचे शिवधनुष्य पेलत आहे.

एका वृत्तानुसार, गोपालचे आईवडील अंध आहेत. लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी त्याच्या अंगावर आली आहे. हैद्राबादच्या रस्त्यावर तो ही रिक्षा चालवतो. बालवयात रिक्षा चालवणं हे उचित नसून त्याला त्याच्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी हा मार्ग पत्करावा लागला असला तरी लहानवयात रिक्षा चालवणे कितपत योग्य?

 

महत्वाच्या बातम्या
”राज्यसभेवर खैरेंसारख्या मराठी माणसाला डावलून अमराठी चतुर्वेदींना पाठवता आणि बेळगावला पराभव झाला की मराठी अस्मिता दुखावते ?”
मोठी बातमी! महाराष्ट्र सदन प्रकरणी छगन भुजबळ यांना क्लीनचीट
मुख्यमंत्र्यांनी वचन पाळले! ऑलिम्पीक विजेत्यांसाठी स्वत: जेवन बनवत, स्वतःच्या हाताने जेऊ घातले
आईसोबत फिरून त्याने विकल्या बांगड्या, पण जिद्दीने IAS अधिकारी होत केले आईच्या कष्टाचे चीज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.