काही दिवसांपूर्वी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्यातील शालेय शिक्षणात भगवद्गीता आणि संत साहित्यांचा समावेश करावा, अशी मागणी केली होती. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांनी भाजपवर टीका देखील केली आहे.(education minister varsha gaikwad statement about relegious education)
भाजप पक्षाकडून शालेय शिक्षणाच्या भगवद्गीता आणि संत साहित्यांचा समावेश करण्याची मागणी केली जात होती. यावर शालेय अभ्यासक्रमात कोणत्याही धर्माचे अध्यात्मिक शिक्षण दिले जाणार नाही, अशी भूमिका राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतली आहे. शालेय अभ्यासक्रमात अध्यात्मिक शिक्षणाचा समावेश करण्याऐवजी मुलांना वैज्ञानिक शिक्षण दिले पाहिजे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
काही राजकीय पक्ष(Political Parties) राजकारण करण्यासाठी अशी मागणी करत आहेत, असे म्हणत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, “भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ आहे. शालेय शिक्षणात जर एका धर्माच्या ग्रंथाचा समावेश केला, तर इतर धर्माच्या ग्रंथांचा देखील समावेश करावा लागेल”, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
“इतर धर्मातील लोक सुद्धा त्यांच्या धार्मिक ग्रंथाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी करतील. त्यामुळे ही मागणी मान्य करता येणार नाही. धर्मनिरपेक्ष या तत्वाचा भारतीय संविधानामध्ये समावेश आहे. मुलांच्या मनात शालेय शिक्षणाच्या सुरवातीपासूनच असे विचार रुजवण्याची गरज आहे”, असे देखील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
विध्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने घातलेल्या नवीन निर्णयांबाबत माहिती देताना संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज आहे. राज्य सरकार त्यासाठी पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने पुण्यामध्ये राजीव गांधी सायन्स सिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.”
“कोणतेही धार्मिक शिक्षण शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना देता येणार नाही. धर्मग्रंथांचे वाचन घरी करावे. शालेय शिक्षणात त्याचा समावेश करता येणार नाही “, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट सांगितले आहे. यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
आमिर खान माझं पहीलं प्रेम होता, मी त्याला माझे फोटो आणि प्रेमपत्र पाठवायची; अभिनेत्रीचा खुलासा
नितीन गडकरींची संसदेत मोठी घोषणा; पुढच्या तीन महिन्यांत ‘हे’ टोल नाके होणार कायमचे बंद
“पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती वाढवून भाजपने जनतेला चार राज्यांतील विजयाची भेट दिली”