ईडीची आणखी एक मोठी कारवाई; विश्वजित कदमांचे सासरे, व्यावसायिक अविनाश भोसलेंची चौकशी

आमदार प्रताप सरनाईक यांचे घर व कार्यालयांवर ईडीने छापे टाकल्याचे प्रकरण ताजे असतानाच प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्याकडे आता ईडीने मोर्चा वळवला आहे. गेल्या तीन दिवसांत राज्यात ईडीने केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची सुमारे दहा सात चौकशी केली. FEMA कायद्यांतर्गत ही चौकशी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ईडीने शुक्रवारी सकाळी अविनाश भोसले यांना मुंबईत बोलावून घेतले. त्यामुळे ते सकाळी १० वाजता ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांची दहा तास चौकशी करण्यात आली.

दरम्यान, यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या. तसेच अचानक झालेल्या या चौकशीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अविनाश भोसले हे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. मनी परकीय चलनाविषयीच्या `फेमा` कायद्यांतर्गत त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. विदेशी चलन प्रकरणात फेमा कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येते. सीमाशुल्क बुडवल्याप्रकरणी फेमा अंतर्गत दंडात्मक कारवाईची तरतुद आहे.

कोरोना विषाणूचा जन्म भारतात, तिथूनच जगभरात पसरला; चीनचे संशोधक बरळले

मुलाने केलेल्या घाणेरड्या आरोपांवर बाजू मांडताना कुमार सानू झाले रडवेले; म्हणाले

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.