Bihar : बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचे सरकार स्थापन झाले. या सरकारची फ्लोअर टेस्ट होण्याच्या आधीच बिहार आणि झारखंडमध्ये ईडी आणि सीबीआयकडून छापे टाकण्यात आले आहे. जमीन देवाणघेवाण प्रकरणी सीबीआय आणि ईडीने आरजेडीच्या नेत्यांवर छापेमारी केली आहे.
पटणा येथील आरजेडीचे आमदार सुनील सिंह याच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात सीबीआयने आरजेडी आमदार सुनील सिंह यांच्यावर छापेमारी केली आहे. यासोबतच इतर नेत्यांवरही ईडी आणि सीबीआयने छापा टाकला आहे.
राज्यसभा खासदार अशफाक करीम यांच्या घरीदेखील छापा टाकला असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय झारखंडमधील रांची येथे बेकायदेशीर खाणकाम आणि खंडणी प्रकरणी छापे टाकण्यात आले आहेत. झारखंडमधील प्रेम प्रकाश यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज बिहारमध्ये नितीश कुमार सरकारची फ्लोअर टेस्ट होत असताना त्याआधीच ही छापेमारी सुरु झाली. झारखंड, तामिळनाडू, बिहार आणि दिल्लीतील १७ ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. त्यातच सुनील सिह यांच्या घरीही ईडी पोहोचली आहे.
ईडी आणि सीबीआयच्या छापेमारीनंतर सुनील सिंह यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जाणीवपूर्वक सीबीआय आणि ईडीकडून हा त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच आरजेडीचे आमदार आपल्यासोबत येतील या भीतीने तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुनील सिंह यांनी भाजपवर निशाणा साधत भाजपच्या इशाऱ्यावर ही कारवाई केली जात असल्याचे सांगितले. यापूर्वीदेखील लालूप्रसाद यादव यांच्यावर छापेमारी करण्यात आली होती. त्यांनतर आज परत ईडी आणि सीबीआय दोन्हीकडून एकाच वेळी आरजेडीच्या नेत्यांवर छापे टाकण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
Shweta Tiwari: श्वेता तिवारीच्या मुलीने ऑटो सीटवर झोपून दिली सेक्सी पोज, फोटो पाहून लोकांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा
Raju Srivastava: राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट, सुनील पॉल म्हणाला, सर्व काही प्रार्थनांवर..
Nitin Gadkari: वाजपेयी अन् अडवाणींमुळेच भाजपची सत्ता आली असं गडकरी का म्हणाले? वाचा यामागचे कारण
Raj Thackeray : राज ठाकरे भाजपचे प्रवक्ते, ते भाजपचीच तळी उचलतात, शिवसेनेची जहरी टीका