राज्याच्या आणखी एका मंत्र्यावर ईडीने कारवाई केली आहे. महाराष्ट्राचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या कारवाईत ईडीकडून १३ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे काँग्रेसचे नेते आशिष देशमुख देखील अडचणीत आले आहेत.(ED action on state minister prajkt tanpure)
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्यावर ईडीने मालमत्ता जप्तीची कारवाई केली. राम गणेश गडकरी साखर कारखान्याच्या नावाने नागपूरमध्ये ९० एकर जमीन होती. ही जमीन तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केली होती. तक्षशिला सिक्युरिटीज ही काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या मालकीची कंपनी आहे.
ईडीने या कारवाईत तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केलेली ९० एकर जमीन सुद्धा जप्त केली आहे. राम गणेश गडकरी साखर कारखान्यावर केलेल्या कारवाईत ईडीने ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मालकीच्या दोन जमिनी जप्त केल्या आहेत. या जमिनींची किंमत जवळपास ७ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे.
ईडीने केलेल्या कारवाईत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मालकीची १३ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरमधील साखर कारखान्याची ९० एकर जमीन आणि अहमदनगरमधील ४ एकर जमिनीचा समावेश आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट २०१९ मध्ये गुन्हा दाखल केला होता.
हा गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याबाबत चौकशी सुरु केली होती. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांचा जबाब ईडीने नोंदवला होता. हा तपास सुरु असताना ईडीने ही करावी केली आहे. राम गणेश गडकरी हा साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधित कंपनीला नाममात्र दरात विकण्यात आल्याचा आरोप आहे.
काही दिवसांपूर्वी ईडीने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनी लौंड्रिंग प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणात न्यायालायने मंत्री नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना सुद्धा ईडीने १०० कोटींच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर आता ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
बिबट्याशी दहशत! औरंगाबादमध्ये धावत्या दुचाकीवर बिबट्याने घातली झडप आणि.., वाचून थरकाप उडेल
भाजपाला मतदान करणं महिलेला पडलं महागात, गुंडानी केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण
देशासाठी कायपण! रशियन सैन्याला रोखण्यासाठी बदादुर युक्रेनियन सैनिकाने स्वत:ला पुलासोबत उडवले