…तर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे व सुप्रिया सुळेंना सहा महीने तुरूंगात बसावे लागणार

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे.

याबाबत निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला म्हणजेच सीबीडीटी यासंदर्भात विनंती केली आहे. यासंदर्भात निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’त प्रसिद्ध झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका RTI कार्यकर्त्यांकडून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDT ला निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासण्यास सांगितले आहे.

दरम्यान, ज्या उमेदवारांविरोधात प्रतिज्ञापत्रांमध्ये चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारी येतील त्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली जाईल.’ अशी ठाम भूमिका निवडणूक आयोगाने जून महिन्यांत स्पष्ट केली होती. यानंतर याबाबत घडामोडी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचा दोषी उमेदवारावर काय होते कारवाई?
प्रतिज्ञापत्रांमध्ये चुकीची माहिती दिलेली असल्यास त्या उमेदवाराला कठीण शिक्षा देण्यात येणार आहे. यामध्ये निवडणूक आयोगाच्या कलम ८ अ अन्वये अपात्र ठरविल्याबद्दल किमान दोन वर्षांची शिक्षा आवश्यक असल्याचे आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. याचबरोबर सहा महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा किंवा दंड असे या शिक्षेचे स्वरूप असणार आहे.

याचबरोबर जर या तपासादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये चुकीची माहिती असल्यास यांना देखील कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
नैसर्गिकरित्या शरीरातील आॅक्सीजन लेव्हल वाढवण्यासाठी करा ‘हे’ नामी उपाय
या झाडाच्या देखभालीचा खर्च आहे १५ लाख आणि २४ तास कडक पहारा; काय खास आहे या झाडामध्ये?सुशांत आणि रियाचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल; समोर आले ‘ते’ कृत्य

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.