पेरू खाल्याने होते ‘या’ गंभीर आजारापासून सुटका

पेरू तर सगळ्यांना आवडतो पण पेरूचे अनेक फायदे आपल्याला माहिती नाहीत. अनेकांच्या घरी पेरूची झाड देखील असतात. पण कच्चा पेरू खाण्याचे फायदे असतात हे त्यांना माहिती नसते. पेरू व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे प्रमुख स्रोत आहे. तसेच पेरूच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया पेरू खाण्याचे फायदे.

पेरू सात्त्विक गुणधर्माचा व बुद्धिवर्धक असल्याने बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीने पेरू खाल्ला असता मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा प्राप्त होते.

दुपारी जेवणानंतर पेरू खाणे अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये असणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे तसेच ग्लुकोज, टॅनिन अ‍ॅसिड या घटकांमुळे जेवण सहजरीत्या पचते.

पेरू खाताना त्यावर संधव व जिरे मिरे पूड घालून खावे. यामुळे पेरूमध्ये असणारे कफकारक व वातकारक गुण दूर होऊन पेरू बाधत नाही.

पिकलेल्या पेरूची भाजी करून खाता येते. तसेच पेरूचा जाम, कोंशबीर, चटणी, रायते व मुरंबाही करता येतो. हे सर्व पदार्थ रुचीकारक असल्यामुळे अरुची, भूक मंदावणे, आम्लपित्त या विकारांवर पेरूचे विविध प्रकार करून खावेत.

पेरूच्या बीया चावून-चावून खाल्ल्याने त्या शरिरातील लोहाच्या कमतरता भरुन काढतात. पेरूमध्ये असलेल्या लायकोपीन या घटकामुळे कॅन्सर आणि ट्युमरचा आजार होण्यापासून बचाव करता येऊ शकतो.

मलाविरोधी त्रास जाणवत असेल तर सलग तीन-चार दिवस पेरूचे सेवन करा. त्यामुळे आतड्यांची हालचाल वाढून घट्ट मल पुढे सरकला जातो व पोट साफ होण्यास मदत होते. तोंडाचा अल्सर बरा करण्यासाठी पेरू उपयुक्त ठरू शकतो.

मधुमेह, मोतीबिंदू, खोकला, हृदयविकारच्या आणि वजन कमी होण्याच्या समस्येसाठी पेरूचे सेवन उपयुक्त ठरत असते. पेरू कॉलेस्ट्रॉल कमी करून उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून वाचवतो.

सकाळी सकाळी उपाशीपोटी पेरू खाणे खूप फायदेशीर ठरते. तुमच्या तोंडातून वास येत असेल तर पेरूचे पान चावल्यास फायदेशीर ठरते.

पेरूच्या पानांचा काढा करून त्याने गुळण्या केल्यास किंवा तो काढा थोडा वेळ तोंडात धरून ठेवल्यास दंतविकार, हिरड्यांची सूज व मुख विकार दूर होतात.

पेरूच्या पानांना वाटून त्याचे पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट डोळ्यांच्या खाली लावायची. यामुळे डोळ्यांच्या खाली असणारे काळे डाग व सूज कमी होण्यास मदत होते.

नेहमी मध्यम पिकलेला पेरू खावा.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.