भाजपच्या वेबसाईटवर खा. रक्षा खडसेंचा लाजिरवाना उल्लेख; वाचून तुम्हालाही संताप येईल

राज्यातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर गंभीर बाब समोर आली आहे. रावेर मतदारसंघातील भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे अपमानकारक उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमूख यांनी भाजपाने दोषींवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल या प्रकरणी कारवाई करेल असा इशारा दिला आहे.

भाजपचे BJP. Org  हे अधिकृत संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर रक्षा खडसे यांच्या नावापूढे आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. याचा स्क्रीनशॉर्ट पत्रकार स्वाती चतूर्वेदी यांनी ट्वीटरवर शेअर केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले आहे.

याबाबत खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, सेव्ह महाराष्ट्र फॉर बीजेपी या पेजवरून हे व्हायरल झालं आहे. माझी बदनामी करण्याचा हा डाव असून पक्षाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमूख यांनी ट्विट करत म्हटले की, “भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र सायबर पुढील कारवाई करेल.” असा इशारा अनिल देशमूख यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
आनंद दिघे: जिल्ह्याप्रमुख पदावर असूनही कार्यालयात राहून कार्यकर्त्यांनी आणलेले डबे प्रेमाने खाणारा नेता
तब्बूच्या साड्यांना इस्त्री करत होता बॉलीवूडचा ‘हा’ दिग्दर्शक; आज एका चित्रपटासाठी घेतो करोडो रुपये
‘राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या, दिल्लीतही तेच वातावरण तयार केलं’
पाच महिन्यांच्या मुलीसाठी आई-वडिलांची धडपड, 16 कोटींच्या इंजेक्शनसाठी क्राउड फंडिंग

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.