कपिल देव यांच्यासोबत खेळणारे माजी भारतीय क्रिकेटपटू विजय यादव सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्या दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्या असून ते सध्या डायलिसिसवर आहेत. त्यांना बरे होण्यासाठी किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे. विजय यादव(Vijay Yadav) यांच्या किडनी प्रत्यारोपणासाठी भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनने पुढाकार घेत निधी जमवण्यास सुरवात केली आहे.(Earlier, a girl was lost in a car accident, now a former cricketer is facing death)
५५ वर्षीय विजय यादव यांनी भारतासाठी १९ वनडे आणि १ कसोटी सामना खेळला आहे. १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय यादव यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १९९३ मध्ये त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव कसोटी खेळली होती. भारतीय संघाने तो कसोटी सामना एक डाव आणि १३ धावांनी जिंकला होता.
या कसोटी सामन्यात विजय यादव यांनी ३० धावा केल्या होत्या. या सामन्यात विजय यादव यांनी दोन स्टंपिंग देखील केले होते. त्यानंतर विजय यादव यांना कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. १९९२ ते १९९४ या दोन वर्षांच्या कालावधीत विजय यादव यांनी भारतीय संघाकडून १९ वनडे सामने खेळले.
या १९ वनडे सामन्यांमध्ये विजय यादव यांनी ११८ धावा केल्या होत्या. विजय यादव हे भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यासोबत देखील क्रिकेट खेळले आहेत. १९९१ च्या रणजी स्पर्धेमध्ये विजय यादव आणि कपिल देव हरियाणा संघात होते. त्यावेळी हरियाणा संघाने रणजी क्रिकेट स्पर्धा जिंकली होती.
विजय यादव यांनी प्रथम क्रिकेट श्रेणीमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी ८९ सामन्यांत ३६.२५ च्या सरासरीने ३९८८ धाव केल्या आहेत. यामध्ये विजय यादव यांनी ७ शतके आणि २३ अर्धशतके झळकावली आहेत. त्यांनी संघात यष्टिरक्षकाची देखील भूमिका बजावली आहे. २०१७ मध्ये त्यांचा भारत ‘अ’ संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यात आला होता.
त्यावेळी विजय यादव भारत ‘अ’ संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. विजय यादव यांना यापूर्वी दोनदा हृदयविकाराचा झटका आला आहे. अनेक वर्षांपूर्वी फरीदाबादमध्ये विजय यादव यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात विजय यादव थोडक्यात बचावले होते. पण या अपघातात त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता.
महत्वाच्या बातम्या :-
पुण्यातील मोठमोठी हॉटेल्स, मंगल कार्यालये महापालिकेने केली जमीनदोस्त; वाचा यामागचे खरे कारण
आता सिनेमागृहातही वाजणार ‘भोंगा’; मनसेने मोठी घोषणा करत तारीखही सांगीतली
भोंग्यांसाठी परवानगी आवश्यक करणारे पोलीस आयुक्त पांडेंची बदली; ठाकरे सरकारचा निर्णय