प्रवासासाठी पुन्हा लागणार ई-पास; जाणून घ्या कसा काढायचा ई-पास

मुंबई | राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. लस, बेड, ऑक्सिजन यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

राज्यात कठोर नियम लागू केल्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवेला मुभा देण्यात आली आहे. आता राज्यात अत्यावश्यक कारणांसाठी आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवास करायचा असेल तर ई-पास असणे बंधनकारक केले आहे.

जाणून घ्या कसा काढावा ई-पास

१. ई-पास काढण्यासाठी https://covid19. mhpolice. in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ई-पास साठी नोंदणी करावी लागेल.

२. त्यानंतर ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे त्याची माहिती भरा. नाव, मोबाईल नंबर प्रवासाचे कारण, व्यक्ती याबाबत माहिती द्यावी.

३. अर्ज पुर्ण भरल्यानंतर एक टोकन नंबर दिला जाईल. प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर मिळालेला टोकन आयडीद्वारे ई-पास डाऊनलोड करावा लागेल.

४. पासमध्ये तुम्हाला वाहनाचा नंबर, पासची कालवधी आणि क्यूआर कोड देण्यात येईल. प्रवासाच्या वेळेस तुम्हाला ई-पास सोबत ठेवावा लागेल.

५. कोणतीही व्यक्ती किंवा समूह ई-पाससाठी अर्ज करू शकतात. अंत्यविधी, विवाहसोहळा,  आरोग्य अत्यावश्यक या कारणांसाठी ई-पास मिळू शकतो.

राज्यात ब्रेक द चैन अंतर्गत २२ एप्रिल पासून रात्री ८ वाजेपासून १ मे पर्यंत कठोर नियमावली लावण्यात आली आहे. खाजगी बसेसना ५० टक्के क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  सर्वसामान्य लोकांसाठी लोकल सेवा पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. किराणा दुकाने, भाजीपाला, फळे, अंडी, मांस विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ ही वेळ देण्यात आली आहे.

दरम्यान देशात कोरोनाने रौद्र रुप धारण केले आहे. दि. २२ रोजी ३ लाख ३२ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख ८६ हजार ९२० रुग्णांनी जीव गमावला आहे. दिवसेंदिवस आकडेवारी वाढत असल्याने देशात चिंतेची लाट पसरली आहे.
महत्वाच्या बातम्या-
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी शरद पवार मैदानात; साखर कारखान्यांना दिले ऑक्सिजन निर्मितीचे आदेश
ऑक्सिजन तुडवड्यावर मार्ग काढण्यासाठी शरद पवार मैदानात; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
भारतातील परीस्थीती गंभीर, भारताला कोरोनापासून वाचवण्यासाठी आम्ही तयार आहोत; चीनचे आवाहन

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.