सुरेश पाटील- सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्यापेक्षा ऑन फिल्ड ऍक्टिव्ह राहणारा अधिकारी

 

 

पोलिस अधिकारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो खाकीवर्दीत असणारा रुबाबदार दिसणारा माणूस. अनेक पोलिस अधिकारी आपल्या कामांमुळे नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका अधिकाऱ्याची गोष्ट सांगणार आहोत जे फिल्ड जबाबदारीने राहतात आणि सोशल मिडीयापासून लांब.

या अधिकाऱ्याचे नाव म्हणजे डीवायएसपी सुरेश पाटील. सुरेश पाटील यांची आपण कधीही सोशल मिडीयावर चर्चेत किंवा कोणत्याही बॅनरवर दिसत नाही. पण त्यांचे फिल्डवरचे काम म्हणजे टॉप क्लास.

स्पर्धा परिक्षा पास करण्यासाठी अनेक विद्यार्थी क्लास लावताना दिसतात, पण काही विद्यार्थी परिस्थितीमुळे गावाकडेच राहून क्लास न लावता स्पर्धा परिक्षा पास करतात, त्यातलेच एक नाव सुरेश पाटील यांचेही आहे.

सुरेश पाटील हे मुळचे कोल्हपुरच्या गडहिंग्लजचे. त्यांच्या शालेय शिक्षण कांगने येथे असणाऱ्या नवोदय विद्यालयात झाले होते. पुढे कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी बी.ई पुर्ण केले.

त्यांना लहानपणापासून इंग्रजी माध्यमातून शिकण्याची इच्छा होती, हे ग्रामीण भागात कठिण असले तरी नवोदय या संस्थेमुळे ते शक्य झाले होते. त्यांचे वडील आर्मीत होते.

वडिलांना सैन्याच्या युनिफॉर्ममध्ये बघत असल्याने त्यांना लहानपणासूनच युनिफॉर्मबद्दल खास आकर्षण होते. सुरेश आठवीत असताना त्यांचे वडिलांचे निधन झाले, त्यामुळे सगळी जबाबदारी आईवर आली.

त्यानंतर त्यांच्या भावाने शिक्षण सोडून शेती सुरु केली. सुरेश पाटीलांचे शिक्षण पुर्ण होऊन ते अधिकार होईपर्यंत आईने आणि भावाने त्यांना आर्थिक पाठबळ दिले होते. सुरेश पाटील स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण झाले होते त्यानंतरही ते जाहिराती आणि मुलाखातींपासून लांब राहिले. २०१६ मध्ये त्यांची डीवायएसपी म्हणून निवड झाली होती.

सोशल मिडीयावर ऍक्टीव्ह राहण्याऐवजी मी व्यक्तीमत्व विकासात कशी सुधारणा करता येईल याकडे जास्त लक्ष देत असतो. तसेच आपल्या कामात नावीण्य कसे आणता येईल याच्यावर भर देत असतो, तीच आपल्या कामाची पोचपावती असते, असे सुरेश पाटील यांनी म्हटले आहे.

२०१६ च्याच बॅचला त्यांची एसआयटी म्हणून निवड झाली होती पण त्यांनी डीवायएसपीची पोस्ट निवडली. त्यांची पहिली पोस्टींग उस्मानाबाद येथे झाली. जातीय आणि धार्मीक तणावासाठी हा भाग नेहमीच चर्चेत असतो. तरीही शिवजयंती असो वा मोहरमसारखे उत्सव कोणताही तणाव निर्माण होऊ न देता पार पाडले.

तसेच फक्त न्याय नाही तर त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम पार पाडले. वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही त्यांनी केले.

सध्या त्यांची पोस्टींग माजलगाव येथे झालेली आहे. तिथे त्यांनी महिल्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधी गुन्हे तपासांवर विशेष भर दिला आहे. तसेच दलित अत्याचार कायद्याची अंबलबजावणीवरही विशेष भर दिला आहे.

सुरेश पाटील नेहमीच शासकीय ड्युटी आणि सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी मग्न असतात. अनेक अधिकारी काम कमी पण पब्लिसीटी जास्त करताना दिसून येतात, पण सुरेश पाटील सोशल मिडीयावर ऍक्टीव्ह नसले तरी ते फिल्डवर नेहमीच ऍक्टीव्ह असतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.