तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आजही या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा'( Tarak Mehta Ka Ulta Chashma) या मालिकेतील दयाबेनच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळाले आहे. (dyaben entry in tarak mehta ka ulta chashma show )
गेल्या काही दिवसांपासून दयाबेन हे पात्र मालिकेमध्ये दिसत नव्हते. त्यामुळे प्रेक्षकांची मोठी निराशा झाली होती. पण आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दयाबेन हे पात्र लवकरच मालिकेमध्ये परतणार आहे. नुकताच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये सुंदर लाल फोन करून जेठालाल सांगतो की त्याची बहीण ‘दयाबेन’ लवकरच घरी परत येणार आहे. हा नवीन प्रोमो सोनी सब चॅनलने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. हा प्रोमोचा व्हिडिओ शेअर करत असताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सुंदरलाल जेठालालला चांगली बातमी देत आहे. तुम्ही अंदाज लावू शकता का? तारक मेहता का उल्टा चष्मा पाहत राहा.”
यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या नवीन प्रोमोच्या व्हिडिओला लाइक केले आहे. तसेच काही चाहत्यांनी ही बातमी खोटी निघाल्यास आम्ही मालिका पाहणे बंद करणार, असे सांगितले आहे. अभिनेत्री दिशा वाकाणीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ दयाबेनचे पात्र साकारले आहे. पण २०१७ मध्ये अभिनेत्री दिशा वाकाणीने या मालिकेचा निरोप घेतला होता. दिशा वाकाणीने निरोप घेतल्यानंतर दयाबेनचे पात्र मालिकेतून गायब झाले होते.
आता पुन्हा एकदा दयाबेनचे पात्र ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत परतणार आहे. ही बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे चाहते दयाबेनची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण दयाबेनची भूमिकेत अभिनेत्री दिशा वाकाणी की आणखी कोणती अभिनेत्री दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ युजर्सकडून शेअर देखील करण्यात येत आहे. प्रेक्षक आतुरतेने दयाबेनच्या पात्राची वाट पाहत आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अनेक कलाकार बदलले आहेत. मात्र प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात ही मालिका अजूनही अव्वल क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या :-
पुण्यात लष्करी जवानाचा कोर्टाच्या आवारातच बायको-सासूवर गोळीबार; बायको ठार तर सासुची मृत्यूशी झुंज
मुंबई इंडियन्सला मिळणार ट्रॉफी जिंकण्याची दुसरी संधी, IPL नंतर दुबई लीगमध्ये उतरणार संघ
शेतीचा बांध कोरल्याचा ट्रॅक्टर जप्तीसह पाच वर्षांचा कारावास? जाणून घ्या काय आहे कायद्यातील तरतूद