आयपीएलमध्ये घेतलेल्या अर्जून तेंडूलकरला मुंबईच्या टिममधून दिला डच्चू

भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जून तेंडूलकरला मुंबईच्या संघातून डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला मुंबईच्या संघातून डच्चू मिळाला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

वेगवान गोलंदाज असलेला अर्जूनला सय्यद मुश्ताफ अली ट्रॉफी स्पर्धेत संधी देण्यात आली होती. त्यामध्ये त्याने खुप खराब कामगिरी केली होती. त्याने दोन ओव्हरमध्ये फक्त १ विकेट घेतली होती. त्याच्या कामगिरीवर सर्वच नाराज असल्याने त्याला २० फेब्रूवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी संधी देण्यात आलेली नाही.

विजय हजारे ट्रॉफीच्या सरावावेळी अर्जूनने ५३ धावा दिल्या होत्या. तर ४.१ षटकात एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळेच त्याला संघात सहभागी केलं नसल्याचं बोललं जात आहे. त्याच्या या कामगिरीमुळे येत्या आयपीएलच्या हंगामात त्याच्यावर कोणता संघ बोली लावतो ते पाहावं लागणार आहे.

मुंबई संघातील खेळाडू

श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, सुर्यकूमार यादव, आदित्य तारे, अखिल हेरवाडकर, आकाश पारकर, सुजित नायक, आतिफ अटवाल, चिन्मय शंकर, शिवम दूबे, अथर्व अंकोलेकर, सुजीत नायक, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, प्रशांत सोलंकी, तनुष कोटियन, सिध्दार्थ राऊत, मोहित अवस्थी, साइराज पाटिल

म्हत्वाच्या बातम्या-
नवरा सोडून त्याच्या मित्रासोबतच वेड्यासारखी नाचली ‘या’ क्रिकेटपटूची बायको; पहा व्हिडीओ
शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? तरी ते आयसीसीचे अध्यक्ष झाले?
सरकारच्या सांगण्यावरूनच लता मंगेशकर व सचिन तेंडूलकरने ट्विट केले; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.