Share

पोलीस कोठडीदरम्यान मला मारहाण आणि विनयभंग’, केतकी चितळेने सांगितलं तुरुंगात नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेची चर्चेत आली होती. नुकतीच अभिनेत्री केतकी चितळेची जामिनावर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. जामिनावर तरुंगातून सुटका झाल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळेने(Ketaki Chitale) गंभीर आरोप केले आहेत.(During the police custody, I was beaten and molested ‘, said Ketki Chitale)

तुरुंगात असताना आपल्याला मारहाण आणि विनयभंग केल्याचा आरोप अभिनेत्री केतकी चितळेने केला आहे. एका मुलाखतीत अभिनेत्री केतकी चितळेने यासंदर्भात भाष्य केलं आहे. भारतात बेकायदा पद्धतीने अत्याचार करण्यात येतात, असा आरोप अभिनेत्री केतकी चितळेने यावेळी मुलाखतीत केला आहे.

या मुलाखतीत अभिनेत्री केतकी चितळे म्हणाली की, “तुरुंगात असताना मला मजबूत राहणं गरजेचं होतं. कारण, एकतर मला बेकायदा पद्धतीनं माझ्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. बेकायदा पद्धतीनं कुठलंही वॉरंट, नोटीस न देता मला तुरुंगात डांबण्यात आलं. पण मला माहिती होतं की, मी या सर्व गोष्टींना सामोरं जाणार.”

“पण पोलीस कोठडीदरम्यान माझा विनयभंग झाला, मला मारहाण झाली. तसेच काही तरुणांनी माझ्या अंगावर विषारी काळा रंग टाकला. अशा प्रकारच्या अनेक अत्याचाराच्या घटना माझ्यासोबत घडल्या आहेत. अशा प्रकारे भारतात बेकायदा पद्धतीने अत्याचार करण्यात येतात”, असे अभिनेत्री केतकी चितळेने मुलाखतीत सांगितले आहे.

अभिनेत्री केतकी चितळे पुढे म्हणाली की, “इतकं सगळं सोसल्यानंतरही मी हसत बाहेर आले. कारण मी तुरुंगातून बाहेर आले होते. पण मी केवळ जामिनावर बाहेर आले हे लक्षात घ्यायला हवं. माझी लढाई अजून संपलेली नाही”, असे अभिनेत्री केतकी चितळेने मुलाखतीत सांगितले आहे. अभिनेत्री केतकी चितळे २८ दिवस तुरुंगात होती.

अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात अनेक पोलीस स्टेशनमध्ये २२ गुन्हे दाखल आहेत. यामधील एका गुन्ह्यात अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयाकडून जामिन मंजूर झाला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे हीने शरद पवार यांच्याविरोधात एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्री केतकी चितळे हीने अत्यंत हीन शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या :-
शेतीत कष्ट करणारा अन् शेतकऱ्यांची जाण असणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे, पहा फोटो
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे शिंदेंना कधी समजलं? एकनाथ शिंदे म्हणाले…
बाबो! गुवाहाटीतील हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांनी खाल्ले एवढ्या लाखांचे जेवण, वाचा बिलाची यादी

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now