Share

Pune : नवरात्री दरम्यान पुण्यात होतोय तीन दिवसांचा ‘सेक्स तंत्र’ कोर्स; काय आहे नेमका प्रकार? वाचा…

Pune

Pune : पुण्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नवरात्रीचे निमित्त साधत एक जाहिरात तयार करण्यात आली आहे. मात्र, या जाहिरातीने सगळीकडे खळबळ उडाली आहे. ‘सेक्स तंत्र’ नावाची ही जाहिरात आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने सेक्स तंत्र या नावाने एक तीन दिवसांचा कोर्स आयोजित करण्यात आल्याची ही जाहिरात आहे. सत्यम शिवम सुंदरम या फाऊंडेशनमार्फत हा कोर्स आयोजित करण्यात आला असल्याचे या जाहिरातीमध्ये सांगण्यात आले आहे. या कोर्ससाठी तीन दिवसांसाठी १५ हजार रुपये आकारले जाणार असल्याचेही या जाहिरातीत म्हटले आहे.

या कोर्समध्ये वैदिक सेक्स तंत्र, डिव्हाईन फेमिनाईन मस्क्युलाईन एम्बोडिमेंट, चक्र ॲक्टिव्हेशन, ओशो मेडिटेशन अशा अनेक गोष्टी शिकवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील तरुण युवक युवतींसाठी नवरात्रीचे स्पेशल पॅकेज असल्याचे यात सांगितले आहे.

या जाहिरातीबाबत पुणे सायबर पोलीस शोध घेत आहे. या कोर्सचे आयोजक कोण आहेत याचा पोलीस तपास घेत आहेत. तसेच सोशल मीडियावर ही जाहिरात कोणी पसरवली, याचाही पोलीस शोध घेत आहेत. या सगळ्या प्रकाराला पोलिसांनी परवानगी दिली आहे का हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही.

या जाहिरातीवर हिंदू महासंघाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी या जाहिरावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, सेक्स तंत्र या नावाने पुण्यात एक गलिच्छ आणि विकृत व्यवसाय करण्यात येत आहे. याला नवरात्री स्पेशल असे नाव देण्यात आहे.

हा हिंदूंचा आणि त्यांच्या देवतांचा अपमान असून हिंदू महासंघ हे अजिबात सहन करणार नाही. या जाहिरातीमध्ये आयोजकांचा पत्ता, कोर्सचे ठिकाण आणि इतर कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रकार फसवा, घाणेरडा आणि एका विकृत संस्कृतीला जन्म देणारा ठरणार असून हिंदू महासंघ हे होऊन देणार नाही असेही ते म्हणाले आहेत.

यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, पुणे हे विद्येचे माहेरघर असून इथे वेगवेगळ्या राज्यातून तरुण-तरुणी शिकायला येत असतात. सोशल मीडियावर नवरात्रीच्या निमित्ताने सेक्स तंत्र नावाचे शिबीर राबवण्यात येत आहे ज्यात अश्लीशलता दाखवण्यात येत आहे. हे खरोखर कुठल्या फाउंडेशनच्या मार्फत आहे की सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळ्यांचा यात समावेश आहे? याचा तपास पोलिसांनी करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या
shinde government : बारामतीतील ‘हा’ मोठा प्रकल्प जुन्नरला हलवणार; शिंदे सरकारचा थेट शरद पवारांना ‘दे धक्का’
America: मशिदीत स्फोट करायला गेला अन् स्विकारला मुस्लिम धर्म, वाचा नक्की काय घडलं
Shinde Group : शिंदे गटातील मंत्री भुमरेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप ; ८९० कोटींच्या योजनेचे कंत्राट जावयाला
Shivsena : शिंदेंनी शिवसेना फोडली, आता शिवसेनेने काॅंग्रेसला पाडले खिंडार; बड्या नेत्याचा सेनेत प्रवेश

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now