Share

खाकी वर्दी घालून इंग्रजीत बोलणारा निघाला तोतया अधिकारी, MPSC पास न झाल्याने निवडचा चुकीचा मार्ग

नांदेड जिल्हयातून एका तोतया वन अधिकाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. हा तोतया वन अधिकारी खाकी वर्दी घालून लोकांना गंडा घालत होता. अस्खलित इंग्रजी बोलणारा हा तोतया वन अधिकारी(Forest Officer) लाकडांची वाहने अडवायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा. स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत या तोतया वन अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.(duplicate officer arrested by crime branch police)

मिळालेल्या माहितीनुसार, या तोतया वन अधिकाऱ्याचे नाव कपिल गणपतराव पाईकराव असे आहे. कपिल हा ३१ वर्षांचा असून लहानपणापासून तो अभ्यासात फार हुशार होता. पण त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. कपिलने बीसीएचे शिक्षण घेतले आहे. काही वर्षांपूर्वी कपिल स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.

पण त्यामध्ये त्याला यश आले नाही. त्यामुळे कपिलने तोतया वन अधिकारी बनण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने वन विभागाचा अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र देखील तयार केले. त्याने स्वतःचा पेहराव देखील वन अधिकाऱ्यासारखा करून घेतला. कपिलने स्वतःसाठी खाकी वर्दी घेतली. तसेच स्वतः जवळ असलेल्या वाहनावर वन विभागाच्या पथकाचे स्टिकर चिटकवले.

त्यानंतर कपिल खाकी वर्दी घालून लोकांना वन विभागाचा अधिकारी असल्याची ओळख दाखवायचा आणि लोकांची फसवणूक करायचा. किनवट आणि माहूर परिसरात असणाऱ्या सॉ-मिलवर छापा टाकायचा आणि त्याची तपासणी करायचा. या माध्यमातून तो लोकांकडून पैसे उकळायचा. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून या तोतया वन अधिकाऱ्याच्या शोधात होते.

अखेर मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेला तोतया वन अधिकारी कपिल लातूर फाटा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून तोतया वन अधिकारी असणाऱ्या कपिल पाईकरावला ताब्यात घेतले आहे. तसेच तोतया वन अधिकारी कपिलच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वन अधिकारी असल्याचे सांगून कपिलने अनेक सॉ-मिल मालकांची फसवणूक केली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नांदेड पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. फसवणूक झालेल्या लोकांनी पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. या प्रकरणाची सध्या परिसरात चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या :-
गौशाळेत उपासमारीने गायींचा मृत्यु, कावळे तोडत आहेत त्यांचे लचके, दान मागून अन्नाची व्यवस्था
पुर्ण IPL मध्ये चांगली कामगिरी करणारी लखनऊ नेमकं कुठे चुकली? केएल राहुलकडून काय चुकलं?
घरे मिळत नव्हती तेव्हा घरे द्या, मग कमी किंमतीत द्या, किंमत कमी केली तर अर्ध्या किंमतीत द्या, आता अजून…..

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now