Share

Dunith Wellalage Father Death: आशिया चषकात मुलाच्या गोलंदाजीवर सलग 5 षटकार मारले; वडिलांना सहन झाले नाही, हार्ट अटॅकने मृत्यू

Dunith Wellalage Father Death: आशिया कपच्या स्पर्धेत 18 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात महत्त्वाचा सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने 6 विकेट्सने विजय मिळवून सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला, मात्र सामन्याच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली.

श्रीलंकेचा गोलंदाज दुनिथ वेल्लालगे (Dunith Wellalage) यांचे वडील हृदयविकारामुळे मृत्यूमुखी पडले. ही घटना तेव्हाच घडली जेव्हा अफगाणिस्तानचा फलंदाज मोहम्मद नबी (Mohammad Nabi) यांनी दुनिथच्या एका षटकात सलग 5 षटकार ठोकले. वेल्लालगेचे वडील श्रीलंकेच्या कँडी (Kandy) येथे टीव्हीवर सामना पाहत होते आणि आपल्या मुलाच्या या षटकात पाच षटकार ठोकले जाण्याचा धक्का सहन करू शकले नाहीत.

नेमके काय घडलं?

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 169 धावा केल्या होत्या. सामन्यात अजून चुरसही निर्माण झाली नव्हती, परंतु आपल्या मुलाच्या एका षटकात पाच षटकार पाहून वेल्लालगे यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. हा सामना श्रीलंकेने 8 चेंडू आणि 6 गडी राखून जिंकला आणि सुपर-4 मध्ये प्रवेश केला, परंतु हा विजय पाहायला वेल्लालगेचे वडील जिवंत नव्हते. मोहम्मद नबीला ही घटना कळताच तोही काही क्षण स्तब्ध झाला.

मोहम्मद नबीची धुमाकूळ खेळी

अफगाणिस्तानचा अनुभवी फलंदाज मोहम्मद नबी (Mohammad Nabi) यांनी श्रीलंकेविरुद्ध तुफानी अर्धशतक ठोकले. 22 चेंडूत 60 धावा करत त्यांनी सलग 5 षटकार ठोकले, ज्यामुळे दुनिथच्या एका षटकात धुमाकूळ उडाला.

श्रीलंकेचा विजय

170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 18.4 षटकांत 4 गडी गमावून विजय मिळवला. यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिस (Kusal Mendis) यांनी 52 चेंडूत नाबाद 74 धावा केल्या आणि विजय सुनिश्चित केला. कुसल परेरा (Kusal Perera) यांनी 20 चेंडूत 28 धावा ठोकल्या, तर कामिंदू मेंडिस (Chamindu Mendis) यांनी 13 चेंडूत 26 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rahman), अझमतुल्ला उमरझाई (Azmatullah Omarzai), मोहम्मद नबी (Mohammad Nabi) आणि नूर अहमद (Noor Ahmad) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

सुपर-4 आणि अंतिम सामना

आशिया कप 2025 मध्ये ग्रुप ए मधून भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) आधीच सुपर-4 मध्ये प्रवेश झाले होते. ग्रुप बी मधून श्रीलंका (Sri Lanka) आणि बांगलादेश (Bangladesh) सुपर-4 मध्ये पोहोचले. पुढील सामन्यांचा कार्यक्रम असा आहे.

  • 20 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश

  • 21 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान

  • 23 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

  • 24 सप्टेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश

  • 25 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश

  • 26 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका

  • 28 सप्टेंबर – अंतिम सामना

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now