दुकानाबेहर लिहिले, शटर बंद असेल तर कॉल करा, आम्ही आत्म्याप्रमाणे इथे भटकत आहोत; पोलिसांनी दिले असे उत्तर

कोरोनाच्या काळात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी तर दुकानांच्या पाट्या पूर्ण बंद असलेल्या दिसून येत आहेत. कोरोनाचा काळ दुकानदारांसाठी खूपच कठीण गेला आहे.

सोशल मीडियावर एका दुकानाबाहे आणलेली सूचना भयंकर व्हायरल होताना दिसून आली आहे. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून त्या पाटीने धुमाकूळ घातला असून नेटकऱ्यांनी त्या पाटीच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

व्हायरल झालेल्या दुकानाच्या या पाटीवर लिहिले आहे की, जर आमच्या दुकानाचे शटर बंद असेल तर आम्हाला फोन करा. आत्म्याप्रमाणे आम्ही इथेच कुठेतरी भटकत असू. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवर आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी पण मजेशीर पोस्ट लिहिली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भटकंती आत्म्याशी लवकरच पोलिसांची भेट होणार आहे.

सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून लोक पण एकमेकांना तो शेअर करताना दिसून येत आहेत. या फोटोवर लोक मजेशीर कमेंट पण करत आहेत. या फोटोला आतापर्यंत जवळपास २ हजार लाईक्स मिळाल्या आहेत.

एका युझरने तर म्हटले आहे की, आता त्याचा आत्मा जेलमध्ये भटकत असेल आणि दुसऱ्या आत्म्याला आता शांती लाभो. सोशल मीडियावर कोरोनाच्या काळात पुणेरी पाट्या आणि संगमनेरी पाट्या पण मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाल्या होत्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.