‘या’ कारणामुळे अजय व काजोल देवगणच्या मुलीला जावं लागलं परदेशी; काजोलने सांगितलं यामागचं धक्कादायक सत्य

मुंबई। बॉलीवूड मधील अनेक कलाकार हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. काही कलाकारांची मुलं अशी आहे जी कलाक्षेत्रात काम करत नसली तरी त्यांचे अनेक चाहते व ती मुलं प्रचंड प्रसिद्ध आहेत.

एवढंच नाही तर स्टारकिड्स एवढे सुंदर दिसतात की एखादी अभिनेत्री किंवा अभिनेता देखील यांच्यासमोर फिका पडतो. मात्र बरेचसे स्टारकिड्स हे शिक्षणासाठी भारतात नसून बाहेरगावी आहेत, बऱ्याच अभिनेत्री व अभिनेत्यांनी आपल्या मुलांना कलाक्षेत्रापासून लांब ठेवले आहे.

यापैकीच एक नाव म्हणजे न्यासा देवगण. न्यासा देवगण ही अजय देवगन व काजोलची मुलगी आहे. न्यासा देखील प्रसिद्ध स्टारकिड पैकी एक असते. कायम तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण न्यासाला अभिनेत्री होण्याआधी ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

न्यासा ही आपल्या आई वडिलांसोबत मुंबईत नसून सिंगापूरच्या दक्षिण पूर्व आशियाच्या युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये शिकत आहे. याचदरम्यान अभिनेत्री काजोल हीने एका मुलाखती दरम्यान न्यासाला सिंगापूरला पाठ्वण्यामागचं धक्कादायक कारण सांगितलं आहे. जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसेल.

या मुलाखती दरम्यान काजोल म्हणाली की, न्यासाला कायम तिच्या वर्णभेदावरून आणि ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.’सेलिब्रिटी असल्यामुळे मुलीच्या आयुष्यावर परिणाम होईल.’ मुंबईत न्यासाला अनेक धक्कादायक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. जेव्हा ती मुंबईत येते तेव्हा तिला पूर्ण सुरक्षेसोबत आम्ही बाहेर पाठवतो.

कारण तिच्यासोबत काही गोष्टी घडल्या आहेत. आसा खुलासा खुद्द काजोलने केला आहे. सध्या न्यासा सिंगापूरमध्ये राहात आहे. काजोल आणि अजयने मुलीला राहण्यासाठी सिंगापूरमध्ये एक भव्य घर देखील खरेदी केलं आहे. 2018साली दोघे घर खरेदी करण्यासाठी सिंगापूरमध्ये गेले होते. कॉलेजमध्ये न्यासाला राहण्यासाठी पूर्ण सोय होती.

पण न्यासाला गर्दी आवडत नसल्यामुळे काजल आणि अजयने न्यासासाठी खरेदी केलं असं काजोलने सांगितले आहे. न्यासाबद्दल बोलायचं झालंच तर न्यासा ही सध्या मुंबईपासून दूर सिंगापूरमध्ये शिक्षण पूर्ण करत आहे. ती सिंगापूरच्या दक्षिण पूर्व आशियाच्या युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये शिकत आहे. न्यासा ही तिच्या वैयत्तिक जीवनात प्रचंड मग्न आहे. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते व व्हिडिओज व फोटोज शेअर करत असते.
महत्वाच्या बातम्या
बदला घेतलाच! कार्तिक आर्यनने करण जोहरच्या नाकावर टिच्चून एकाचवेळी मिळवले तीन मोठे चित्रपट 
अभिनेता शाहरुख खान मुलगा व मुलगीमध्ये करतो भेदभाव; एका प्रश्नामुळे सत्य आलं समोर 
किरीट सोमय्यांभोवती 40 CISF जवानांचं सुरक्षा कवच, धमक्यांमुळे मोदी सरकारने दिली Z प्लस सुरक्षा 
बिग ब्रेकींग! मुख्यमंत्र्यांच्या वडीलांना पोलीसांनी केली अटक; देशातील पहिलीच घटना

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.