घराणेशाहीमुळे मला सुद्धा अनेक चित्रपट गमवावे लागले – तापसी पन्नू

दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये वेगळी इमेज असणारी बॉलिवूडमधील अभिनेत्री तापसी सुद्धा घराणेशाहीची शिकार बनली होती. याबाबत तापसीने स्वता एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

अनेकदा दिग्दर्शक त्यांच्या ओळखीच्या कलाकारांना काम देतात. अशा वेळेस बाहेरून आलेल्या नवीन कलाकारांना संधी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला जास्त झगडावे लागते.

बाहेरून आलेल्यांना अगोदर ओळखी बनवाव्या लागतात. त्यांनी थोडे समजून घ्यावे की थोडा वेळ लागेल पण तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.

त्यावेळी तुम्हाला मिळालेले यश फक्त तुमचेच असेल. त्यावर कोणाचाच अधिकारी नसेल. असेही ती यावेळी म्हणाली.

स्टार किड्सपेक्षा बाहेरून आलेले नवीन कलाकार हे लोकांनाही आवडतात. मला अनेक चित्रपट घराणेशाहीमुळे गमवावे लागले असेही ती यावेळी म्हणाली. सुशांतच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.