पैसे नसल्यामुळे पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन केला होता १० किलोमीटर प्रवास, त्याच्याच मुलीने केला ‘हा’ कारनामा

ओडिशा। गरिबीमुळे अनेक लोकांना अगदी मरताना देखील हाल सोसावे लागत. आणि ही वस्तुस्थिती आपण सगळेच अनुभवतो. अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने एकदा व्यक्ती जर आजारी पडला तर त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठीही कित्येक लोकांकडे पैसे नसतात.

त्यामुळे कित्येकांना अतोनात हाल सोसावे लागतात. आपण आतापर्यंत अनेक घटना पहिल्या आहेत किंवा ऐकल्या आहेत की, कित्येकांना वेळेवर औषध उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने किंवा वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अशीच एक घटना 2016 मध्ये थुआमुल-रामपूर मंडळच्या मेलाघर गावात राहणाऱ्या दाना माझी यांच्या पत्नीला ओडिसामधील शासकीय रुग्णालयात मृतदेह घेऊन जाण्यास रुगवाहिक वेळेवर मिळाली नसल्याने दाना माझी यांनी आपल्या पत्नीचा मृतदेह 10 किलोमीटर चालत घेऊन आले होते. व त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी चांदनी हीसुद्धा होती.

मात्र आता त्याच चांदणीने दाना माझी यांचं नाव रोशन केलं आहे. चांदनी दहावीची बोर्डाची परीक्षा पास झाली आहे. दहावीच्या निकाल हा शुक्रवारी घोषित करण्यात आला आहे. यामध्ये 2,81,658 मुली सहभागी आहेत ज्यांनी बोर्ड परीक्षा पास केली आहे. दाना माझी यांची गरिबी पाहून केआईएसएस चे संस्थापक डॉ. ए सामंत यांनी त्यांच्या तिन्ही मुलींना शिकण्यासाठी त्यांच्या शाळेत दाखल करून घेतले होते.

मात्र त्यानंतर चांदणीने परीक्षा पास होऊन सर्वांची मन जिंकले आहे. व तिने डॉ. ए सामंत यांचे आभार मानले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.