इमारतीच्या बाल्कनीमध्ये नग्नाअवस्थेत उभ्या होत्या महिला; पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

सार्वजनिक ठिकाणी अश्लीश वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी महिलांच्या एका ग्रुपवर कारवाई केली आहे. काही महिला नग्नाअवस्थेमध्ये शहरातील एका उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.

त्यानंतर पोलिसांनी त्या महिलांवर कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना दुबईमधील आहे. सार्वजनिक ठिकाणी सभ्यता पाळण्यासंदर्भातील नियमांमध्ये नग्नता आणि कायदेबाह्य वर्तन या गुन्ह्यांचा युनायटेड अरब अमिरातीमध्ये समावेश आहे.

या प्रकरणी जर कोणी दोषी आढळले तर त्याला सहा महिने तुरूंगवास आणि पाच दिरम म्हणजे जवळपास १ लाख रूपये दंड आहे. या अशा गोष्टी सोशल मिडीयावर व्हायरल करणेसुद्धा गुन्हा आहे. या महिलांना दोन वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या व्हिडीओमध्ये अनेक महिला नग्नाअवस्थेत बाल्कनीमध्ये उभ्या असल्याचे दिसत होते. दुबईमधील मरिना येथील एका उंच इमारतीच्या बाल्कनीतील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे.

दुबईतील कायदे खुप कठोर आहेत. या देशात याआधीही अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत आणि अनेक लोकांना यामध्ये अटक करण्यात आली आहे. येथील कायद्यांमुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी पॉर्नोग्राफी वेबसाईट बंद केल्या आहेत.

दुबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणेही गुन्हा आहे. तसेच परवाना नसताना दारूचे सेवन करणे यांसारख्या अनेक गुन्हामध्ये येथे कडक शिक्षा दिली जाते. दिवसाढवळ्या हा व्हिडीओ शुट करण्यात आला होता. दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या डजनभर महिलांवर सध्या कारवाई सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या
उर्मिला मातोंडकरमुळे झालता राम गोपाल वर्माचा घटस्फोट; बायकोने उर्मिलाच्या कानाखाली वाजवली होती
तुला चोपणार! राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या लेखकाला रूपाली ठोंबरेंची थेट धमकी
अखेर सचिन वाझेने तोड उघडले; शरद पवार आणि अजित पवारांचे नाव घेऊन केले गंभीर आरोप
शिवसेना मंत्री अनिल परब यांनी मला ५० कोटी वसूल करण्यास सांगीतले; सचिन वाझेचा गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.