आग ओकणाऱ्या उन्हात गरोदर DSP ड्युटीवर, तरी लोकांचे नियम मोडण्याचे काम सुरुच

राज्यातच नाही तर देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी सरकार लोकांवर निर्बंध लादत आहे.

देशभरात कठोर निर्बंध लादले असताना सुद्धा काही नागरीक त्याला तोडताना दिसून येत आहे. पण यावेळी प्रशासन आपली जबाबदारी किती निष्ठेने पार पाडत आहे, याचे एक उत्तम उदाहारण समोर आले आहे.

लॉकडाऊनमध्ये छत्तीसगडच्या दंतेवाड्याच्या डीएसपी शिल्पा साहू रस्त्यावर फिरणाऱ्या, विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या लोकांना घरी बसण्याचा सल्ला देत आहे. विशेष म्हणजे पाच महिन्यांच्या गर्भवती असतानाही त्या तापत्या उन्हात आपली जबाबदारी पार पाडताना दिसत आहे.

कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयंकर असल्याचे चित्र समोर आहे. त्यामुळे गर्भवती असले म्हणून काय झालं ड्युटी फर्स्ट म्हणून भर उन्हात शिल्पा आपली जबाबदारी पार पाडत आहे. शिल्पा कारण नसताना घर सोडणाऱ्या, रिकाम्या फिरणाऱ्या लोकांना घरी बसण्याचा सल्ला देताना दिसून येत आहे.

शिल्पा यांचा ड्युटीवरचा हा फोटो आयपीएस अधिकारी दिपांशु काब्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोला आतापर्यंत १४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.

तसेच हा फोटो पाहून खुप लोकांनी कमेंट पण केल्या आहे. काही लोकांनी शिल्पा यांचे कौतूक केले आहे. तर काही लोकांनी कोरोनाच्या संकट काळात शिल्पा यांनी आपली आणि आपल्या बाळाची काळजी घ्यावी, असेही म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

चाहता अभिनेत्रीला भेटायला गेला अन् डायरेक्ट किस करुनच आला; व्हिडिओ झाला व्हायरल
रिक्षा चालवणाऱ्या गरीब नॅशनल चॅम्पीयनचा खेळ बघून आनंद महिंद्रा झाले फिदा; दिली मोठी ऑफर
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अत्यावश्यक सेवेतील दुकाने आता फक्त ‘या’ वेळेत उघडी राहणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.