DSP मिश्रा हात जोडून विनवत होते मला मारू नका, पण अमर दुबेने निर्दयीपणे गोळ्या झाडल्या

कानपुर | कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटर होऊन खूप दिवस झाले पण त्याच्याबद्दल अनेक खुलासे हिट आहेत. तो जितका क्रूर होता त्याचे साथीदारही तितकेच क्रूर होते. विकास दुबेचा साथीदार शशिकांत पांडेच्या आईचा आणि पत्नी मनुचा विडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत शशिकांत ची सासू बोलत आहे की, अमर दुबेने DSP देवेंद्र मिश्राला गोळी मारली होती. त्या वेळेस देवेंद्र मिश्रा विनवत होते की, मला नका मारू पण अमर दुबे खाली उतरला आणि त्याने देवेंद्र मिश्रा यांना शिवी दिली आणि त्यांना गोळ्या मारून ठार केले.

पोलिसांच्या चौकशीत शशिकांत ची पत्नी मनूने खूप राज सांगितले आहेत. DSP देवेंद्र मिश्रा यांची हत्या मनूच्या घराच्या अंगणात झाली होती. देवेंद्र मिश्रा यांना अमर दुबेने गोळी मारली होती.

देवेंद्र मिश्रा आणि काही पोलीस अमर दुबेला विनवणी करत होते गोळी मारू नका पण अमर दुबेने त्यांचं ऐकलं नाही आणि त्याने पोलिसांची हत्या केली. अमर दुबेने गोळी मारल्यानंतर DSP देवेंद्र मिश्रा यांचे पायही कापले होते.

शशिकांत ची बायको मनू हिने पोलिसांच्या चौकशीत अनेक खुलासे केले आहेत. अमर दुबेने देवेंद्र मिश्रा यांच्या डोक्यात गोळी मारली आणि नंतर त्यांचे पाय कापले होते. गोळी मारल्यानंतर अमर म्हणाला की, या पोलीस अधिकाऱ्याने विकास भैयाला खूप त्रास दिला आहे.

मनू ने सांगितले की, DSP देवेंद्र मिश्रा छतावरून उडी टाकून अंगणात आले. तेवढयात अमर दुबेही तिथे आला. तिचे सासरे म्हणजे प्रेम प्रकाश आणि अमर दुबेनी देवेंद्र मिश्रा ला पकडले आणि इतक्या गोळ्या मारल्या की देवेंद्र यांच्या शरीर पूर्ण रक्तबंबाळ झाले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.