क्रूरतेचा कळस! दारूच्या नशेत आईचं पोटच्या मुलीसोबत अमानुष कृत्य; गाडीला बांधलं अन् फरफटत नेलं…

नवी दिल्ली। आई म्हणजे दैवत असतं. मुलं जन्माला आल्यावर आपल्या आईवर आंधळ्या प्रमाणे विश्वास ठेवत असतं. मात्र बऱ्याचदा काही वेळा असं होतं की आईवडील काही चुकत असतील तर मुलं त्यांना मार्ग दाखवत असतात.

असच काहीस एका ८ वर्षाच्या मुलीनं आपल्या आईला सांगितलं मात्र आईला त्या मुलीचा राग आल्याने आईनं क्रूरतेने आपल्या 8 वर्षाच्या मुलीला कारसोबतच फरफटत नेलं यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. यावेळी आईनं प्रचंड दारू प्यायली होती व याच नशेत तीन आपल्या मुलीला जखमी केलं आहे.

ही घटना अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील आहे. एरिन ग्रेशिया (वय ४४) अस या महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरिन ग्रेशिया हिच्या ८ वर्षाच्या मुलीनं तिला दारू पिऊन गाडी चालवण्यास मनाई केल्यानं तीन रागाच्या भरात हे पाऊल उचललं आहे.

दारूच्या नशेत असलेल्या आईला कार चालवण्यापासून या मुलीन रोखण्याचा प्रयत्न केला होता. व त्यामुळे तिची आई भडकली. एरिन एवढ्यावरच थांबली नसून नशेत एरिनला काहीच कळत नव्हतं.तिनं रागात गाडी सुरू केली आणि रेस वाढवली. मुलीचा हात हॅण्डलमध्येच अडकून राहिला आणि ती काही अंतर गाडीसोबतच फरफटत गेली.

300 मीटर अंतर पुढे जाताच एका व्यक्तीनं हे पाहिलं, त्यानं महिलेला रोखलं आणि तिची चूक तिला दाखवून दिली. मात्र, महिलेनं पुन्हा गाडीची रेस वाढवली आणि या व्यक्तीलाही गाडीसोबत फरफटत नेलं. या घटनेनंतर संपूर्ण प्रकारच्या पोलीसांना माहिती मिळताच पोलीस

तेव्हा ते एरिनच्या आईच्या घरी पोहोचले. तिथे पोलिसांनी महिलेच्या मुलीला पाहिलं. तिला भरपूर दुखापत झाली होती. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल करत तिच्या आईचा शोध घेण्यास सुरुवात केली.

महिला घरामागे असलेल्या झुडपांमध्ये लपलेली होती. व त्यानंतर पोलिसांना तिच्या शोध घेण्यास यश मिळाले मात्र ज्यावेळी पोलीस कर्मचारी तिला अटक करण्यासाठी जवळ गेला तेव्हा तिनं त्याला लाथ मारली. व शेवटी खूप प्रयत्नानंतर तिला अटक करण्यात आली.

मुलीसोबत गैरवर्तन करणे, तिच्यावर हल्ला करणे, आणि पोलिसाला मारहाण केल्याचा आरोप एरिनवर करण्यात आला असून आता तिला पोलीसांनी अटक केली आहे. मात्र एक आई असून आपल्या मुलीवर अन्याय व तिला इजा पोहचवल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या
‘सध्याची ईडीची अवस्था रस्त्यावर चलन कटणाऱ्याप्रमाणे’, सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला
ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या सोमय्यांचे मुंबईत जंगी स्वागत
जिवंतपणीच आमदाराच्या मृत्यूची बातमी व्हायरल; संतप्त आमदार म्हणाले..
‘या’ ५ सोप्प्या स्टेप्स वापरा आणि घरातल्या कचऱ्यापासून बनवा उदबत्या; सुरु करा स्वतःचा व्यवसाय…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.