सुशांत आणि रियासाठी परदेशातून मागवले जात होते ड्रग्स, ‘या’ पत्यावर व्हायची डिलिव्हरी

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येताना पाहायला मिळत आहेत. या प्रकरणी आता पार्ट्या आणि त्यातील ड्रग्स सेवन हा नवा मुद्दा समोर आला आहे.

तसेच यामुळे नक्कीच या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा एनसीबीची टीम कसून तपास करत आहे. वेगवेगळ्या मार्गांनी महत्त्वाची माहिती मिळवत आहे.

अशातच एनसीबीच्या सूत्रांनी या प्रकरणी मोठा खुलासा केला आहे. ड्रग्सची ऑर्डर रिया चक्रवर्ती देत होती पण ड्रग्सची डिलेव्हरी सुशांतच्या घरच्या पत्यावर होत होती,’ अशी माहिती सध्या या प्रकरणाबाबत हाती येत आहे.

दरम्यान, ड्रग्स माफिया मागणीनुसार हे हाय क्वॉलिटी बड्सची तस्करी करून भारतात आणले जातात आणि पेडलर्सच्या माध्यमातून डिस्ट्रीब्यूट केले जातात,’ अशी माहिती देखील समोर येत आहे.

तसेच सुशांत आणि रियाला ड्रग्स नेदरलँडमधील एम्स्टर्डम शहर, कॅनडा आणि युकेमधून येत होते. याचे कारण असे की, या दोघांनाही हाय क्वॉलिटीचे ड्रग्स आवडत होते जे भारतात इंपोर्ट केले जात आहे, अशी माहिती तपासादरम्यान मिळत असल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या 

सुशांतचे दाजी झाले भावूक! सांगितला सुशांतबद्दलचा ‘तो’ किस्सा..

पवना डॅमवर सुशांतची व्हायची ड्रग्स पार्टी? NCBने तपासाची चक्रे फिरवली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.