तुम्ही जुन्या वाहनांची नोंदणी केली नाही, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी

मुंबई | पंधरा वर्षांनंतर अनेक जुन्या वाहनांची वयोमर्यादा संपते. ही वाहने धोकादायक बनतात. या वाहनांचे नुतनीकरण होणे गरजेचे आहे. मात्र रस्त्यावर नूतनीकरण किंवा नोंदणी न करताच अनेक लोक वाहन चालवत आहेत. अशा लोकांसाठी आता धोक्याची घंटा आहे.

बरेच लोक आपले वाहन जुने झाले तरी, त्याची नोंद करून घेत नाहीत. याशिवाय जुनी वाहने दुसऱ्याकडून खरेदी करतात त्याची नोंद झालेली नसते. तर अशा लोकांनी आपल्या वाहनांची नोंदणी पटकन करुन घ्यायला हवी. सरकारची नवी सूचना एप्रिलप्रर्यंत येण्याची शक्यता आहे.  ही सुचना दुचाकी चारचाकीसह इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी असेल.

दरम्यान, बजेटमध्ये स्क्रॅप नीतीवर विशेष लक्ष दिले गेले आहे. यानंतर परिवहन विभागाने याबाबतचे आपले काम सुरू केले आहे. परिवहन विभागाकडून जुन्या वाहनांची यादी तयार करण्यात येत आहे. यानुसार एप्रिलपासून रस्त्यावर बंद पडून असलेली वाहने रस्त्यावरुन उचलून इतर मोकळ्या ठिकाणी हलवली जाणार आहेत.

तसेच, गेल्या काही दिवसांपासून जुन्या वाहनांचे रजिस्ट्रेशन थांबवले गेले होते. अशात अनेक वाहनांची नोंदणी केली गेली नाही. ती वाहने नोंदणीशिवाय तशीच पडून आहेत. यादरम्यान नवीन नियम आल्यास या वाहनांना रस्त्यावर चालवण्यास परवानगी नसेल असे सांगण्यात येत आहे.

स्क्रॅप वाहनांचा दंड
३००० – पेट्रोल कार
३५०० – डिझेल कार
२००० – मोटार

तसेच, गेल्या काही दिवसांपुर्वीच रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन भंगार धोरणाला मान्याता दिली आहे. यानुसार भारतातील सरकारी विभाग आणि PSUs द्वारे खरेदी करण्यात आलेल्या १५ वर्षांपेक्षा जास्त जुनी वाहने भंगारत जाणार आहेत. परंतु याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२२ पासून होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
स्क्रॅप गाड्यांवर ‘आरटीओ’कडून कारवाईला सुरुवात, महापालिकेने थांबविली स्वत:ची जुनी वाहने
तुमच्याकडे जुनी कार असेल तर सावधान! कारण सरकारने बदललेत नियम, वाचा सविस्तर
आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी द्यावी लागणार नाही टेस्ट; वाचा काय आहे सरकारचा नवा नियम
गाडीला आरसे नसतील तर लवकर बसवा, नाहीतर आरटीओ देणार ‘ही’ शिक्षा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.