भुक लागली की फक्त बिअर प्यायचा, २ महिन्यातच पठ्याने घटवले १८ किलो वजन

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि तुम्ही जर डॉक्टरांकडे गेलात तर तुम्हाला सर्वात आधी सांगितले जाते की आहारातील साखरेचे प्रमाण कमी करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मद्यपान करणे टाळा. कारण या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी घातक आहेत आणि त्यामुळे खुप झपाट्याने वजन वाढते.

त्यामुळे डॉक्टर नेहमी हेल्दी फूड घेण्याचा सल्ला देतात. मात्र तुम्हाला विश्वास बसणार नाही अमेरिकेतील एका व्यक्तीने फक्त बिअर पिऊन आपलं वजन कमी केलं आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे डेल हॉल. त्यांनी बिअर पिऊन चक्क १८ किलो वजन कमी केले आहे.

अमेरिकेच्या सिनसिनाटी शहरातील रहिवासी असणारे डेल हे आधी आर्मीमध्ये होते. त्यांनी ४६ दिवस फक्त बिअर पिऊन दिवस काढले. दोन महिने त्यांनी काहीच खाल्ले नाही. त्यांना ब्रेकफास्ट करायला जास्त आवडत नाही. दिवसातून पाच वेळा ते बिअर पितात.

जेव्हा भुक लागेल तेव्हा ते बिअर पितात. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे. हॉल यांचे म्हणणे आहे की, त्यांचे ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगरसुद्धा नियंत्रणात आली आहे. त्यांना त्यांचे शरीर आता योग्य वाटत आहे. त्यांचे वजन कमी झाल्याचा त्यांना खुप आनंद आहे.

आता ते त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकतात. ते असेही म्हणाले आहेत की त्यांनी वजन कमी करण्याचा हा जो फॉर्मुला वापरला आहे तो दुसरा कोणी फॉलो करावा असं त्यांना आजिबात वाटत नाही आणि ते कोणाला सांगतही नाहीत.

महत्वाच्या बातम्या
१५ किलो वजन कमी केल्यानंतर आज ‘अशी’ दिसते आशिक बनाया फेम तनूश्री दत्ता; पहा व्हिडीओ
बीयर घेऊन जाणारा टेम्पो झाला पलटी; मद्यपींनी पळवले बीयरचे बाॅक्स
बारमध्ये दारु पिऊन तरुण-तरुणींमध्ये तुफान हाणामारी, पहा संपुर्ण व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.