DRDO CEPTAM 11 Recruitment 2025 : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) अंतर्गत येणाऱ्या सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM-11) मध्ये विविध तांत्रिक पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती ऑनलाईन अर्जाद्वारे ९ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. DRDO CEPTAM 11 Recruitment 2025 अंतर्गत एकूण 764 रिक्त जागा उपलब्ध आहेत.
रिक्त पदांमध्ये प्रमुख पदे ही वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (STA-B) – 561 जागा आणि तंत्रज्ञ-ए (Tech-A) – 203 जागा यांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक बी पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्स, इंजिनियरिंग, टेक्निकल किंवा कॉम्प्युटर सायन्स मध्ये पदवी घेतली असावी. यासोबत केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत आहे.
वेतनश्रेणी
-
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी : ₹35,400 ते ₹1,12,400
-
तंत्रज्ञ-ए (Tech-A) : ₹19,900 ते ₹63,200
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड दोन टप्प्यांत केली जाईल.
टियर-१ : संगणक आधारित चाचणी (CBT) – ही पहिली स्क्रीनिंग परीक्षा असून यशस्वी उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील.
टियर-२ : कौशल्य/व्यापार चाचणी – टियर-१ पास झालेल्या उमेदवारांना पदानुसार कौशल्य किंवा व्यापार चाचणी द्यावी लागेल.





