Video; द्रविडने कोच होताच जिंकले सर्वांचे मनं, शास्त्री-कोहलीने बंद केलेली परंपरा केली सुरू..

टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या टी20 सामने सुरू आहेत. यामध्ये टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने रवी शास्त्री व विराट कोहली यांनी खंडीत केलेली परंपरा पुन्हा सुरू केली आहे. याचे आता महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी कौतुक देखील केले आहे. वर्ल्डकपनंतर या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे असताना हर्षल पटेलला माजी गोलंदाज अजित आगरकर याच्याकडून पदार्पणाची कॅप देण्यात आली. अनिल कुंबळे यांनी त्यांच्या प्रशिक्षकपादाच्या कार्यकाळात पदार्पणवीराला माजी खेळाडूंच्या हस्ते कॅप देण्याची प्रथा सुरू केली होती. अनेक दिवस ती सुरू होती.

असे असताना मात्र शास्त्री व कोहली यांच्या कार्यकाळात त्यात खंड पडला. आता द्रविडने ती पुन्हा सुरू केली आहे. याबाबत सुनील गावस्कर यांनी समालोचन करताना ही माहिती दिली आहे. यामुळे सामना संपल्यावर याची चर्चा सुरू होती.

दरम्यान, या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करताना न्यूझीलंडच्या संघाला बॅकफूटवर फेकले. मार्टीन गुप्तीलच्या स्फोटक सुरुवातीनंतर किवींनी पॉवर प्लेमध्ये १ बाद ६४ धावा केल्या होत्या, परंतु त्यापुढील १४ षटकांत त्यांना ५ बाद ८९ धावा करता आल्या. या सामन्यात हर्षल पटेलने २ विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंडने ६ बाद १५३ धावा केल्या होत्या. पदार्पणवीर हर्षल पटेल म्हणाला, देशाची जर्सी घालण्याच्या भावना काही वेगळीच असते. या खेळावर प्रेम करता म्हणून तुम्ही खेळायला सुरुवात करता आणि तेव्हा तुमच्यासमोर टीम इंडिया हेच ध्येय असते.

तसेच मी स्वतःला वचन दिले होते की मी स्वतःला गृहीत धरणार नाही. राहुलभाईंनी मला सांगितले, की तुझा सराव झाल्यानंतर इथे ये आणि खेळाचा आस्वाद घे. स्थानिक क्रिकेटमधील ९-१० वर्ष, आयपीएलनंतर मी इथवर पोहोचलो. याचे मला खूप समाधान आहे. भारताने हा सामना सहज जिंकला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.