Share

Dr. Shirish Valsangkar : सोलापुरातील डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मोठा ट्विस्ट, सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, ओळखही पटली

Dr. Shirish Valsangkar : सोलापुरातील(Solapur) प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर(Dr. Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्येप्रकरणी(suicide case) नवा खुलासा समोर आला असून, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. संबंधित महिलेचे नाव मनीषा मुसळे-माने असे असून, ती डॉ. वळसंगकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती.

डॉ. वळसंगकर(Dr. Shirish Valsangkar) यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मनीषा मुसळे-माने यांच्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख केला होता. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला अटक केली.

धमकी आणि आर्थिक अनियमिततेमुळे निर्माण झाला तणाव?

सूत्रांनुसार, डॉ. वळसंगकर(Dr. Shirish Valsangkar) रुग्णालयातील आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेवर भर देत होते. मात्र, काही व्यवहार कागदोपत्री न नोंदवता होत असल्याचा त्यांना संशय होता. त्यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर संबंधित महिलेला कामावरून दूर केले. त्यानंतर या महिलेने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. या धमकीमुळे डॉ. वळसंगकर मानसिक तणावात गेले होते, असेही बोलले जात आहे.

कोण होते डॉ. शिरीष वळसंगकर?

69 वर्षीय डॉ. शिरीष वळसंगकर(Dr. Shirish Valsangkar) हे सोलापूरमधील अग्रगण्य न्यूरोफिजिशियन होते. त्यांनी S P Institute of Neurosciences ही आधुनिक सुविधांनी युक्त संस्था उभारली होती. शिक्षणासाठी त्यांनी सोलापूरच्या व्ही. एम. मेडिकल कॉलेजमधून MBBS व MD केलं असून, लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) पदवीही मिळवली होती.

त्यांच्या नावावर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंध, मेंदूविकारांवरील संशोधन कार्य, आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आहे. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतःचं खासगी विमान खरेदी करून भारतात प्रवास केला आणि नवख्या वैमानिकांना मार्गदर्शनही केलं.

घटनाक्रम – त्या दुर्दैवी रात्रीचा

18 एप्रिल, शुक्रवार रोजी रात्री 8 वाजता डॉ. वळसंगकर रुग्ण तपासून घरी परतले. काही वेळाने त्यांच्या बेडरूमच्या बाथरूममधून गोळीबाराचा आवाज आला. दोन वेळा गोळी झाडल्याचा आवाज ऐकून कुटुंबीय बेडरूममध्ये पोहोचले तेव्हा डॉ. वळसंगकर रक्ताच्या थारोळ्यात आढळले. त्यांना तत्काळ त्यांच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान रात्री 10:20 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने तातडीने तपास सुरू केला. बंदूक, रक्ताचे नमुने आणि अन्य पुरावे जमा करण्यात आले आहेत.

या हृदयद्रावक घटनेने सोलापूरसह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, एक प्रगल्भ आणि अनुभवी डॉक्टर अशा दुर्दैवी कारणामुळे गमावल्याचे दु:ख सर्वत्र व्यक्त होत आहे.
dr-valsangkar-suicide-case-in-solapur-big-twist

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now