डॉ. शीतल आमटे – करजगी यांच्या मृत्युच्यादिवशी नेमकं काय घडलं होतं? घ्या जाणून

मुंबई | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आज आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यू नंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होतं आहे.

वाचा डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्युच्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या एफआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी १२:१५च्या सुमारास आनंदवनात डॉ. शीतल यांच्या शयन कक्षातून सकाळपासून बाहेर आल्या नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिला सविता बोपसे यांनी आज शीतल बाहेर का आल्या नाही? म्हणून शीतल यांच्या शयन कक्षात प्रवेश केला.

त्यावेळी त्यांना डॉ. शीतल या बेशुद्ध अवस्थेत दिसल्या. घर काम करणाऱ्या सविता बोपसे यांनी शीतल यांचे पती गौतम करजगी यांना बोलावून आणले. शीतल यांच्या भोवती काही औषधे पडल्याचे त्यावेळी लक्षात आले. शीतल आमटे त्यांच्या आनंदवन येथील घरी बेशुद्धावस्थेत सापडल्याने. त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

त्यावेळी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात कोणतीही महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याने डॉ. शीतल यांचे पार्थिव चंद्रपूरच्या शासकीय वैदकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. या प्रकरणी पोलीस म्हणतात, आम्ही आकस्मिक मृत्यूच्या कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे. मृत देहाच्या तपासणीनंतर अधिक माहिती मिळेल, अशी माहिती चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवी यांनी माध्यमांना दिली आहे.

दरम्यान,चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक निलेश पांडे यांनी म्हटले आहे की “त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ही आत्महत्या आहे की नक्की काय यावर भाष्य करता येणार नाही.”

काही दिवसापूर्वी केले फेसबुक लाईव्हमुळे चर्चेत…
काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे-करजगी या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी 20 नोव्हेंबर 2020 ला फेसबुक लाईव्ह करून महारोगी सेवा समितीकडून केल्या जाणाऱ्या कामावर आणि विश्वस्तांवर काही आक्षेप घेतले होते.

या लाइव्हमध्ये त्यांनी कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही काही आरोप केले होते. नंतर अर्ध्या तासाचं ते फेसबुकवरील लाईव्ह संभाषण डॉ. शीतल यांनी डिलिट केले. या व्हिडिओचा पोलीस सध्या तपास करत आहेत.

शीतल यांच्या आत्मह.त्येनंतर आमटे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया…
शीतल यांच्या आत्मह.त्येनंतर आमटे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शीतल यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमच्यासाठी हे सगळं अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्ही सर्व जण शॉकमध्ये आहोत,’ असे त्यांनी म्हंटले.

याचबरोबर ‘याची कल्पना आम्ही काहीच केली नाही. आम्ही सध्या पूर्णपणे शॉकमध्ये आहोत. प्रतिक्रिया देण्यालायक काही राहिलंच नाही. आम्ही हादरून गेलो आहोत.’ अशा शब्दांत दिगंत आमटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
हेमा मालिनी- धर्मेंद्र पुन्हा झाले आजी-आजोबा; घरात एकाच वेळी डबल धमाका
‘एमडीएच’ मसालेचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.