जामखेडच्या डॉक्टरांचा नाद नाय! ना रेमडेसिवीर, ना महागडी औषधं, तरी कोरोना रुग्ण झटपट बरे

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातलेले आहे. अशात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर सर्वात महत्वाचे मानले जात आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका डॉक्टरबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी रेमडेसिवीरविना अनेक रुग्णांना बरे केले आहे.

कोरोनाच्या संकटात रेमडेसिवीरचा काळा बाजार होत आहे. त्यामुळे रुग्णांना कोरोनाचा औषोधोपचार परवडत नाहीये.अशा परिस्थितीत जामखेड येथील डॉक्टर रवी आरोळे यांच्या कोरोनावर उपचार करण्याची पद्धतीची चर्चा सगळीकडेच सुरु आहे.

जामखेडच्या जुलिया रुग्णालयात डॉ. आरोळे हे कोविड रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटात सर्वात महत्वाचे समजल्या जाणाऱ्या रेमडेसिवीरचा वापर कमीत कमी करता, त्यांनी आयसीएमआरने सांगितलेल्या औषधांचा वापर करुन आतापर्यंत त्यांनी ३७०० रुग्ण बरे केले आहे.

विशेष म्हणजे या कोविड रुग्णालयाचा मृत्यु दर सरासरीपेक्षाही कमी म्हणजेच फक्त ०.६४ टक्के एवढा आहे. डॉ. आरोळे यांच्या कामाची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी घेतली आहे. जामखेडच्या जुलिया रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये स्वतंत्र उपचारपद्धती यशस्वीपणे राबवत असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे.

सध्या राज्यात एकीकडे रेमडेसिवीरचा तुडवडा निर्माण झाला आहे. मात्र या रुग्णालयात कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जात नाही. येथे रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयसीएमआर मान्यताप्राप्त औषध आणि ऑक्सिजनचा पुरवठा कोरोनाबाधित रुग्णांना केला जातो. विशेष म्हणजे या उपचारपद्धतीने रुग्ण लवकर बरे होताना दिसत आहे.

विशेष म्हणजे या रुग्णालयात दिली जाणारी औषधे अत्यंत स्वस्त आहे. तसेच येथे कोणतेही महागडे उपचार घेण्याची गरज पडत नाही. डॉ. आरोळे यांच्या उपचारामुळे मोठ्या प्रमाणात फरक पडत असल्याने ग्रामीण भागातील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता अशी उपचारपद्धती सर्वत्र वापरावी असे पत्रही डॉ. आरोळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बिग ब्रेकींग! अनिल देशमुखांना अटक? १०० कोटींच्या खंडणी प्रकरणी सीबीआयने घेतलं ताब्यात
अनिल देशमुखांचा पाय खोलात! १०० कोटी खंडणीप्रकरणी सीबीआयने दाखल केला एफआयआर
अनिल देशमुख आता पुरते अडकले! मुंबई नागपुरातील घरांवर सीबीआयने टाकले छापे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.