“भाजप नेते रेमडेसिवीर इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं”

राज्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होत आहे. असे असताना राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा निर्माण होत आहे.

आता राज्यात रेमडेसिवीर या औषधावरुन सत्ताधारी पक्षात आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत आहे. अशात आम्ही ब्रुक फार्माकडून रेमडेसिवीर विकत घेण्यासाठी अन्न आणि औषध खात्याचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून परवानगी घेतली होती, असे भाजप नेत्यांने म्हटले होते.

भाजप नेत्यांच्या दाव्यावर आता डॉ. शिंगणे यांनी खुलासा केला आहे. भाजपचे नेते रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं आहे, अशी प्रतिक्रीया डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

डॉ. राजेंद्र यांनी एक ट्विट करत व्हिडिओ शेअर केला आहे. रेमडीसीविर इंजेक्शनचा पुरवठा व साठा यावरून उलट सुलट तर्क लावले जात आहे आणि यावरून भारतीय जनता पक्ष माझ्या नावाचा अपप्रचार करत आहे. कुठलाही पक्ष हा वैयक्तिक रित्या इंजेक्शन साठा खरेदी करू शकत नाही. त्यांना तो सरकारला द्यावा लागतो, असे ट्विट डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

तसेच भाजपमधील काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला होता. तुम्ही आमच्या सप्लायरकडून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करावीत, असे त्यांनी मला सांगितले. आता ते मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करेल, असेही डॉ. शिंगणे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीये. तसेच बेड्स, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचाही अभाव राज्यात जाणवत आहे. अशात काही ठिकाणी रेमडेसिवीरचा काळाबाजार केला जात असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजप नेते संजय काकडेंना पुणे पोलिसांनी केली अटक; गुंड गजा मारणे रॅली प्रकरण भोवणार 
आजकाल कुठे गायब आहे गोविंदाची ‘आंखे’ चित्रपटातील अभिनेत्री?
आईची माया! मुलाला तुरुंगातून सोडवण्यासाठी खोदले ३५ फूट भुयार; पुढे काय झाले वाचा…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.