…तर देशातील प्रत्येकाला नाही द्यावी लागणार कोरोनावरील लस – आयसीएमआर

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. अशातच कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर ती देशातील किती नागरिकांना आणि कधी दिली जाईल असी विचारणा केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने आज कोरोनाची लस आणि लसीकरणाबाबत मोठं विधान केलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आज पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला आयसीएमआरचे अध्यक्ष बलराम भार्गवा आणि केंद्रीय आरोग्य सचिव उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे अध्यक्ष बलराज भार्गवा यांनी आज महत्त्वाची माहिती दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘आपले उद्देश करोनाची साखळी तोडण्याचा आहे. त्यामुळे लसीकरण लसीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असणार आहे. जर आपण गंभीर लोकांचं लसीकरण करण्यास आणि विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो, तर आपल्याला देशातील संपूर्ण लोकसंख्येला लस देण्याची गरज नाही.’

दरम्यान, यावेळी बोलताना आरोग्य सचिवांनी सांगितले की, केंद्र सरकारने संपूर्ण देशात लसीकरण करण्याचा दावा कधीही केलेला नाही. अशा शास्त्रीय गोष्टींबाबत तथ्थ्यांच्या आधारावर बोलले गेले पाहिजे, असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या
आंदोलकांबद्दल केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; ‘…तर शेतकऱ्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं’
‘…अन् पोलिसांनी थेट राजू शेट्टींच्या कॉलरला घातला हात’, आंदोलनात कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने
मुंबईत ‘सुपर स्प्रेडर’चा धोका वाढण्याची शक्यता, BMC कडून ‘मास टेस्टिंग’ची मोहिम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.