डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान ‘राजगृहाची’ अज्ञातांकडून तोडफोड

मुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेकडकरांचे मुंबईत राजगृह नावाचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाची आज मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे.

अज्ञातांनी या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले आहेत. तसेच घराच्या काचांवरही त्यांनी दगडफेक करून काचा फोडल्या आहेत.

घराच्या आवारातील कुंड्याही फोडल्या असून कुंड्यांचे बरेच नुकसान झाले आहे. राजगृह हे मुंबईतील आंबेडकरांचे निवासस्थान असून त्यांनी ते पुस्तके ठेवण्यासाठी बनवले होते.

जगभरातील आंबेडकरांचे अनुयायी येथे भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचे स्थान आहे. संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरू येथे आले आणि त्यांनी हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोलचे असून सर्व सीसीटीव्ही फुटेज हे आंबेडकरांच्या कुटुंबियांकडून पोलिसांना देण्यात आले आहेत. आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांना शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.