Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जगातले सगळ्यात मोठे व्यक्तिगत ग्रंथालय होते; बघा किती होती पुस्तकं…

Mayur Sarode by Mayur Sarode
December 6, 2020
in ताज्या बातम्या, राज्य, लेख
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जगातले सगळ्यात मोठे व्यक्तिगत ग्रंथालय होते; बघा किती होती पुस्तकं…

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्याचे भाषा वैभव, त्या लेखनामागचा त्यांचा विचार आजही वाचकाला थक्क करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले पहिले न्यायमंत्री होते.

डॉ. आंबेडकर हे पहिले असे भारतीय होते ज्यांनी परदेशात जाऊन अर्थशास्त्रातील पहिले डॉक्टरेटची पदवी मिळवली. आंबेडकरांनी दलितांच्या आणि मागासवर्गीय लोकांच्या प्रगतिकरिता आपल्या संपूर्ण जीवनाचा त्याग केला होता.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकरांच्या काही रंजक गोष्टी…

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आईवडिलांचे १४ वे मुल आणि शेवटचे मुल होते.

२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्वज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत कामगार होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वडील ब्रिटिश इंडियन आर्मीत होते.

३) डॉ. आंबेडकर यांचे मूळ आडनाव अंबावडेकर होते, पण त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांनी त्यांचे नाव शाळेलचे रेकॉर्डमध्ये आंबेडकर असे टाकले होते.

४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये दोन वर्षे प्रिन्सिपल होते.

५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानात असलेल्या कलम ३७०, ज्यात जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला आहे त्याच्या विरोधात होते.

६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकमेव असे भारतीय आहेत, ज्याचे प्रतिमा लंडन संग्रहालयात कार्ल मार्क्स यांच्यासोबत लावण्यात आली आहे.

७) भारताच्या तिरंग्यात अशोक चक्र लागण्यामागचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच दिले जाते.

८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर Labor Member of the Viceroy’s Executive Council चे सदस्य होते. त्यांनीच नियमात बदल करून कारखान्यात १४ तास काम करण्याचा नियम ८ तासांवर आणला होता.

९) डॉ. बाबासाहेब आंबेडकरच होते ज्यांनी महिला कामगारांसाठी विशेष कायदे बनवले. ज्यात Maternity Benefit for women Labor, Women Labor welfare fund, Women and Child, Labor Protection Act सारखे कायदे आहेत.

१०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची प्रचंड आवड होती. असे म्हटले जाते डॉ. आंबेडकरांचे ग्रंथालय हे जगातले सगळ्यात मोठे व्यक्तिगत ग्रंथालय आहे. ज्यात ५० हजारांपेक्षा जास्त पुस्तकं होती.

११) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दोन लग्न झालेले होते. पहिले लग्न १५ वर्षाचे असताना ९ वर्षीय रमाबाई यांच्यासोबत. दुसरे लग्न रमाबाई यांच्यासोबत. रमाबाई यांच्या निधनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकटे पडले होते. त्यामुळे वयाच्या ५७ व्यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉ. शारदा कबीर यांच्याशी लग्न केले होते.

Tags: dr. babasaheb aambedkardr. babasaheb aambedkar librarymarathi articlePuneडॉ. बाबासाहेब आंबेडकरपुणेमराठी आर्टिकल
Previous Post

मोहब्बतें चित्रपटातील प्रीती झंगियानी आता दिसते अशी, फोटो पाहून वेडे व्हाल

Next Post

..नाहीतर पळता भूई थोडी होईल, अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात

Next Post
..नाहीतर पळता भूई थोडी होईल, अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात

..नाहीतर पळता भूई थोडी होईल, अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात

ताज्या बातम्या

जगातील सर्वात घाण माणूस! ६५ वर्षांपासून अंघोळच केली नाही, वाचून तुम्हालाही येईल उलटी

जगातील सर्वात घाण माणूस! ६५ वर्षांपासून अंघोळच केली नाही, वाचून तुम्हालाही येईल उलटी

January 17, 2021
भारतात येणाऱ्या टेस्ला कारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल; धावत्या गाडीत प्रवाशासहित ड्रायव्हरही झोपला

भारतात येणाऱ्या टेस्ला कारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल; धावत्या गाडीत प्रवाशासहित ड्रायव्हरही झोपला

January 17, 2021
महाराष्ट्रातील उद्योजकाची दक्षिण आफ्रिकेत १०-१२ तरुणांनी धारदार शस्त्रांनी केली ह.त्या

महाराष्ट्रातील उद्योजकाची दक्षिण आफ्रिकेत १०-१२ तरुणांनी धारदार शस्त्रांनी केली ह.त्या

January 17, 2021
“कल्याणसारखे रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात कोठे नसतील”; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला घरचा आहेर

“कल्याणसारखे रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात कोठे नसतील”; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला घरचा आहेर

January 17, 2021
दारु, बिअर, वाइन, व्होडका, स्कॉच, देशी आणि विदेशी या सगळ्यांमध्ये काय फरक आहे?

दारु, बिअर, वाइन, व्होडका, स्कॉच, देशी आणि विदेशी या सगळ्यांमध्ये काय फरक आहे?

January 17, 2021
आम्ही कमिटीसमोर जाणार नाही तर…; आक्रमक शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आम्ही कमिटीसमोर जाणार नाही तर…; आक्रमक शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

January 17, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.